Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / वृक्षारोपण व लता मंगेशकर...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

वृक्षारोपण व लता मंगेशकर यांचे गीत गायन करून दिली भावपूर्ण श्रद्धांजली

वृक्षारोपण व लता मंगेशकर यांचे गीत गायन करून दिली भावपूर्ण श्रद्धांजली

राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक समिती चा उपक्रम

प्रतिनिधी: मंगेश तिखट (कोरपना)


                              नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेअंतर्गत राष्ट्रीय कला साहित्य व सांस्कृतिक समिती तर्फे स्थानिक सोनिया गांधी इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूल राजुरा येथे स्वर्गीय लता मंगेशकर जी यांना वृक्षारोपण व त्यांच्या आवाजातील गीत गायन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार जांभुळकर,  नागपूर विभाग अध्यक्ष,नेफडो हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक समितीच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा रजनी शर्मा, महेश जोशी, अमृता धोटे, सोनिया गांधी कॉन्व्हेंटच्या प्राचार्य कृतिका सोनटक्के आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तसेच स्व. प्रभाकरराव मामूलकर यांच्या प्रतिमेला  माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटाचे मौन घेण्यात आले. करुणा गावंडे -जांभुळकर, कृतिका सोनटक्के, मेघा धोटे, उज्वला जयपुरकर, विना देशकर, स्वरूपा झंवर, महेश जोशी, महेंद्र भादिकर, अमृता धोटे आदींनी लता मंगेशकर यांनी गायन केलेले गीत सादर केले. सांस्कृतिक समितीच्या नागपूर विभागीय अध्यक्ष अल्का दिलीप सदावर्ते यांनी गुजरात येथून आभासी पद्धतीने गाणे गायन केले व शोक संवेदना दिल्या. महेश जोशी यांनी स्त्री व पुरुष यांच्या आवाजात एकाचवेळी गायन करुण उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक उपलंचीवार, राजुरा तालुका महिला अध्यक्षा यांनी केले. प्रास्ताविक रजनी शर्मा तर आभार प्रदर्शन कृतिका सोनटक्के यांनी केले. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मोहनदास मेश्राम,  आशिष करमरकर, भास्कर करमरकर, विलास कुंदोजवार, सुनैना तांबेकर, सुनीता उगदे, किरण हेडाऊ, राजश्री उपगन्लावार, पूर्वा देशमुख, ललिता खंडाळे आदिसह सांस्कृतिक समिती, नेफडो व सोनिया गांधी कॉनव्हेट च्या प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...