Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / रामपूर येथे दहा दिवसात...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

रामपूर येथे दहा दिवसात दुसऱ्यांदा रास्ता रोको.

रामपूर येथे दहा दिवसात दुसऱ्यांदा रास्ता रोको.

शिवसेनेच्या वतीने रामपूर येथे आंदोलन; वेकोलीमूळे निर्माण होत असलेल्या समस्या मार्गी लावा

राजुरा (प्रतिनिधी) :  रामपूर-गोवरी-पोवणी रस्त्यावरील जड वाहतूक आणि प्रदुषणासंदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या उपस्थितीत राजुरा शिवसेनेच्या वतीने (दि. ८) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वेकोलीमुळे निर्माण झालेल्या प्रमुख मागण्यांना घेऊन सास्ती-गोवरी टी-पॉईंट रामपूर येथे तीन चार तास रास्ता रोको केल्याने या मार्गावरील कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रका चार तास अडवून ठेवल्याने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

यामध्ये चड्डा ट्रान्सपोर्ट, जैन ट्रान्सपोर्ट, नुराणी ट्रान्सपोर्ट यांच्या मुजोरीने 22 ते 25 टन क्षमता असलेल्या रामपूर गोवरी पोवणी मार्गावर 60 ते 65 टनची जडवाहतूक होत असून ते त्वरित थांबवण्यात यावी, रामपूर गोवरी पोवणी मार्गांवरून होणाऱ्या वाहतुकीच्या धुळीमुळे रस्त्याच्या आजूबाजूच्या शेतीवर परिणाम होत आहे यात पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी रोज 3 ते 4 वेळा रस्त्यावर टँकरनी पाणी चालवण्यात यावे, या मार्गाच्या झालेल्या दुरावस्थेला सर्वस्वी वेकोली जबाबदार असून सदर रस्त्याचे दुरुस्ती करण्यात यावी, भडांगपूर येथून स्थलांतरित रामपूर येथील कुटुंबाना त्यांच्या जमिनीची पट्टे त्वरित देण्यात यावे, गोवरी पोवणी एक्सपान्शन सेकशन-7 लावणाच्या लेखी आश्वासनानुसार ते जानेवारीत मार्गी लागणार होते. त्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्यात यावी, बल्लारपूर एरियातील माती कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणी करण्यात आल्या.

आंदोलनस्थळी वेकोली नियोजन अधिकारी पुल्लया, बारला यांनी स्थानिकांना माती कंपनीत रोजगार व इतर विषयावर चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आश्वासनाची पूर्तता न झाल्यास वेकोली कार्याल्यासमोर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, तालुका प्रमुख वासुदेव चापले, तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, शहर प्रमुख निलेश गंपावार, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, उपतालुका प्रमुख रमेश झाडे, शहर समन्वयक बबलू चव्हाण, माजी सरपंच रामपूर उज्वल शेंडे, रमेश कुंडे, विभाग प्रमुख अजय साकीनाला, तिरुपती काटम, आशाताई उरकुडे सरपंच गोवरी, रामपूर ग्रा प सदस्य संगीत विधाते, लता डखरे, मायाताई मालेकर, वर्षा पंदीलवार, अनिल लिपटे, श्याम मुत्तुंनरी, अतुल खनके, गणेश चोथले, अक्षय लांडे, श्रावण गोरे, किरण पारखी, सुनील पाचभाई, मयूर गोहने, आशिष मालेकर,अनिकेत गिरसावडे, रुपेश गोहनेयासंह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...