Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / प्रशासनाने घेतला शेतकरी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

प्रशासनाने घेतला शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका

प्रशासनाने घेतला शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका

भोयगाव - गडचांदूर रस्ता पूर्ण करण्याचे उपविभागीय अभियंता व कंत्राटदाराचे यांचे लेखी आश्वासन

 

 

प्रतिनिधी. कोरपना: मंगेश तिखट


कवठाळा :  शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अन्यूईटी कार्यक्रमांतर्गत महाकुर्ला-धानोरा-भोयगाव- गडचांदुर या रस्त्याचे काम मंजूर आहे. सदरहू रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असल्याने हा रस्ता व्हावा म्हणून आम्ही वेळोवेळी आंदोलने व शासकीय पाठपुरावा केला. जनतेचे आंदोलन उभारून या रस्त्याच्या कामाला निधी मंजूर करून घेतला. २०१९ पासून विषयांकित रस्त्याचे काम करण्यास सुरवात झाली. 
अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावरून २४ तास वाहतूक सुरू असते. माणिकगड सिमेंट कंपनीत ये-जा करणारे ट्रक्स व वाहने देखील या रस्त्याने जात असतात.   हजारो नागरिक नियमित या रस्त्याचा वापर करीत असतात.  माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी होते.
दरम्यान आज सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील अधिकाऱ्यांना उपस्थित राहून लेखी आश्वासन द्यावे लागेल. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा चांगलाच धसका घेतल्याचे परिसरात बोलले जात आहे.


दरम्यान १ तास नागरिकांना रस्ता रोकला. २२ जून २०२२ पर्यंत रस्ता पूर्ण करण्याबाबतचे लेखी आश्वासन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूर व कंत्राटदार आर. के. चव्हाण यांनी दिले.

महाकुर्ला-धानोरा-भोयगाव-गडचांदूर या मार्गाने ये-जा करताना गर्भवती महिलांचे देखील प्रचंड हाल होत आहेत. पाठीचे, मणक्याचे व हाडांचे आजार वाढले आहे.
महाकुर्ला-धानोरा-भोयगाव-गडचांदूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून काम पूर्ण न झाल्याने धुळीने मार्गालगतच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. कापूस काळवंडला असून इतर शेतपिकाचे उत्पन्न देखील नगण्य झाले आहे.
महाकुर्ला-धानोरा-भोयगाव-गडचांदुर या रस्त्याचे काम जून पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी ॲड. वामनराव चटप यांच्या समवेत निलकंठ कोरांगे, मदन सातपुते, बंडू राजूरकर, रवी गोखरे, रत्नाकर चटप, नरेश सातपुते, विजय निखाडे, विकास दिवे, भाऊजी कन्नाके, मिनाथ बोबडे, दिलीप आस्वले, डॉ. हेपत, मुमताज अली, कब्रेश नगराळे, बबन पिदुरकर, रघुनाथ लोनगाडगे, रवींद्र ठाकरे, विश्वनाथ आसकर, सूर्यभान पोतराजे, महादेव हलके आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...