स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
प्रतिनिधी कोरपना : मंगेश तिखट
गडचांदूर
येथील प्रभाग क्रमांक १ मधून जाणाऱ्या हाय व्होल्टेज च्या विद्युत तारा अनेक नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.
राजुरा फिडर 33000 हाय व्होल्टेज च्या या विद्युत तारा बऱ्याच लोकांच्या घरावरून गेलेल्या आहेत तर काही लोकांच्या प्रत्यक्ष घराच्या आत या हाय व्होल्टेज तारांचे विद्युत खांब स्थापित आहेत. ह्या हाय व्होल्टेज च्या विद्युत तारांमुळे लोकांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे. छतावरून अगदी हात पुरेल एवढ्या अंतरावर असलेल्या या विद्युत तारांमुळे लहान मुलांना खेळण्यासाठी एकटे सोडणे दुभर झाले आहे. सदर हाय व्होल्टेज तारांना नकळत स्पर्श होऊन बऱ्याच लोकांना आपले जिवन गमवावे लागले आहेत तर बऱ्याचश्या लोकांची वित्त हानी झालेली आहे.
मागील डिसेंबर महिन्यात पेंटिंग चे काम करत असलेल्या अवी पोचू रामटेके ह्या गरीब कुटुंबातील व्यक्तीचा हाय व्होल्टेज विद्युत तारांचा शॉक लागून दुर्दैवी अंत झाला. तर आठ महिन्यांची गर्भवती पल्लवी शुभम पेंढारकर ह्या महिलेला शॉक लागल्यामुळे आपला हात गमवावा लागला एकदा नव्हे तर दोन वेळा सदर महिलेला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.
तसेच या पूर्वीसुद्धा अपघाताच्या बऱ्याचश्या घटना घडून आलेल्या आहेत.
राजुरा फिडर 33000 हाय व्होल्टेज च्या विद्युत तारांमुळे प्रभागात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाला धोका निर्माण झाला असून या प्रभागातील लोकांची समस्या
लक्षात घेऊन या प्रभागात राहणाऱ्या जागरूक नागरिकांनी
या आधीच उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि.म गडचांदुर
यांना निवेदन सादर करुन सदर हाय व्होल्टेज विद्युत तारांना त्वरित स्थानांतरित करण्याची मागणी केली आहे.
तसेच या समस्येकडे लक्ष पुरवून हाय व्होल्टेज विद्युत तारांना त्वरित स्थानांतरित करण्याची मागणीला पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याकरिता
प्रभागातील प्रा. जहीर सैय्यद, प्रविण मेश्राम, सतिश भोजेकर, रतन मुन, विनोद हरणे इत्यादी नागरिकांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुभाष भाऊ धोटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...