वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
प्रतिनिधी : शनिवार 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता घुग्घुस येथील वेकोलीच्या आयआर बंकर जवळ कामावर असलेले सुरक्षा रक्षक उमेश शंकर ढाले (36) रा. वणी यांना सुरज सिंग रा. बँक ऑफ इंडिया जवळ घुग्घुस याने रस्ता बंद का केला म्हणून कॉलर पकडून हाथाबुक्क्याने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे त्यांच्या शर्टच्या चार बटना तुटल्या.
फिर्यादी उमेश ढाले यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी सुरज सिंग यांच्यावर कलम 353, 332, 504,506 गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो. नि. बी. आर. पुसाटे यांच्या मार्गदर्शनात सहा. पो. नि. मेघा गोखरे करीत आहे. वृत्तलिहे पर्यंत आरोपीस अटक करण्यात आली नव्हती. यापूर्वी येथील बंकर जवळ वेकोलीच्या अनेक सुरक्षा रक्षकावर हल्ले करण्यात आले आहे.
या बंकर वर कोळसा चोरी करण्यासाठी जवळील मोहल्यातील गुंड प्रवृत्तीचे लोक येतात व त्यांना अडवील्यास सुरक्षा रक्षकावर हल्ले करतात त्यामुळे या बंकर कडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे परंतु चोरी करण्यासाठी जाणारा रस्ता बंद केल्याने चोरांना त्रास होऊ लागला आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...