आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
संजय लोखंडे : बि.आर.एस.पी जिल्हा महासचिवआणि सफेदझेंडा कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाईकराव यांच्या विरोधात 03 फेब्रुवारी रोजी राजुरा तालुक्यातील सूब्बई (चिंचोली) येथील साठ - सत्तरच्या संख्येने प्रकल्पग्रस्त स्तप्त शेतकरी तीन वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनवर धडकले. पाईकराव यांच्यावर शेतकऱ्यांची लुबाडणूक व फसवणूक केल्या प्रकरणी भादंवी 420 नुसार गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पो.उप - निरीक्षक संजय सिंग यांना दिले.शेकडो कि.मी.चा प्रवास करून आलेल्या शेतकऱ्यांनी बि.आर.एस.पी नेता सुरेश पाईकराव यांच्या वागणूक कृत्याचा भांडाफोड केला.
राजुरा तालुक्यातील विरुर पो.स्टेशन अंतर्गत येणारे सूब्बई व चिंचोली गावातील 87 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सोबत वेकोली तर्फे शेतीचा मोबदला व नोकरी मिळवून देतो अशी भूलथापा देऊन चार लाख पस्तीस हजार रुपये लंपास केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.या प्रकरणात 21 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांनी विरुर पो. स्टे.ला तक्रार दाखल केली होती.दहा दिवसां नंतरही कुठल्याही प्रकारे कारवाई होत नसतांना शेतकऱ्यांना फसविणारा पाईकराव आता कामगारांना न्याय मिळवून देण्याचा सोंग करीत असल्याचे निर्दशनास येताच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घुग्गूस येथेच येऊन हल्लाबोल केला.
प्रकल्पग्रस्तां सोबत धोखा कशासाठी ?
गेल्या आठवड्या पासून एसीसी कंपनीच्या न्यू पॅकिंग हाऊस प्लांटच्या कामगारांच्या मागण्यांना घेऊन पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन शुरु आहे. कंपनीवर पी.एफ चोरीचा आरोप लावून कारवाईची मागणी करीत असलेल्या पाईकरावने तक्रार दाखल झाल्याच्या दहा दिवसानंतर ही शेतकऱ्यांचे चार लाख पस्तीस हजार रुपये परत केले नाही.ही विसगती का?
तर नेता व पोलिसांच्या हातमिळवणीनेच सदर प्रकार घडत असल्याचा आरोप ही शेतकऱ्यांनी केला.तसेच या प्रकरणात खासदारांनी शेतकऱ्यांची बाजू संसदेत उचलून धरावी असे आवाहन केले. पाईकराववर 420 चा गुन्हा दाखल न झाल्यास पाईकराव करीत असलेल्या आंदोलन मंडप शेजारीच आंदोलनसुरु करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...