Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / जखमी सुनिता शिंदेला...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

जखमी सुनिता शिंदेला उपचारासाठी २५००० रु.ची आर्थिक मदत

जखमी सुनिता शिंदेला उपचारासाठी २५००० रु.ची आर्थिक मदत

नांदा शिवस्मारक समितीचा पुढाकार

 

  प्रतिनिधी .(कोरपना)

औद्यागिक नगरी नांदाफाटा येथील बाजारपेठेत शेतकरी बाधंवाकडून दररोज ताजा भाजीपाल्याची छोटी गुजरी भरविली जाते याच गुजरीत सुनिता शिंदे ही महिला भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करते १ फेब्रुवारीला ती पहाटे आपला चारचाकी ठेला घेऊन जात असतांना गडचांदूर कडून भरधाव वेगाने येणार्‍या मोटारसायकल स्वाराने तिला मागून जोरदार धडक दिली यात महिलेला गंभीर दुखापत झाली तिच्या पायाला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाला महीलेला मदत करण्याऐवजी मोटारसायकल स्वाराने तिथून पळ काढला पोलीसांनी महिलेला उपचारासाठी चंद्रपूरला हलविले सुनिता शिंदे हिची परीस्थिती हलाखीची पती नाही शेती नाही भाजीपाला विकून दोन पैसे कमविणे हेच एकमेव साधन सुनिता शिंदेला चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले रक्तस्राव झाल्याने रक्त चढवून ४ तारखेला तिचे पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली तिची प्रकृती आता स्थिर आहे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील स्थायी कर्मचारी पांडुरंग खिरटकर  यांचेवर याप्रकरणी गडचांदूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरु आहे पायाला जबर दुखापत झाल्याने किमान वर्षभर तिला उपचार घ्यावा लागेल सुनिता शिंदे हिचेवर अचानक संकट कोसळले सुनिता शिंदेला मदतीचा हात देण्याकरीता नांदा शहर शिव स्मारक समितीने पुढाकार घेतला  तिचे उपचारासाठी २५ हजार रुपये रोख रक्कम देऊन आर्थिक मदत केली पुढेही मदत केली जातील सुनिता शिंदेला अपघात विमा मिळवून देण्यासाठी नांदा शहर शिव स्मारक समिती आवश्यक ती सर्व मदत करणार आहे


त्याने काढली पळ युवक धावले मदतीला

भरधाव वेग निष्काळजीने  गाडी चालवुन अपघात केला महिलेला जबर मार लागला मदतीसाठी आवाज केला त्याने मदत करण्याचे सोडून पळ काढला स्थानिक राजकिय पदाधिकार्‍यांचे आश्वासनच राहले अखेर नांदा येथील युवकांनी पुढाकार घेतला नांदा शहर शिव स्मारक समितीने १५ हजार व पंढरीनाथ गेडाम ग्रा.वि.अ. यांनी १० हजार रुपये रोख रक्कम देऊन उपचार व खर्चा करीता मदतीचा हात दिला

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...