आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती : राज्य सरकारने विदेशी दारूचे कर ५० टक्क्यांनी कमी करून एकीकडे श्रीमंतांना दिलासा दिला असतानाच, जिवती शहरात देशी दारूच्या मूळ किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संबधित प्रकारापासून राज्य उत्पादन शुल्क विभाग अनभिज्ञ असल्याने सामान्यांची लूट, तर श्रीमंतांना दिलासा का, असा प्रश्न तळीरामांकडून विचारला जात आहे. या अधिकच्या किंमतीने तळीरामांच्या खिशाला कात्री बसत आहे.
कोरोनाकाळात मद्याची दुप्पट, तिप्पट नव्हे तर चौपट दराने विक्री शहरात व तालुक्यात- जिल्ह्यात झाली. त्यातून कोणाला किती ‘अर्थ’ लाभ झाला, हा विषय संशोधनाचा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिवती शहरातील वाइन शॉप व सरकारमान्य देशी दारूच्या दुकानातून मूळ किमतीपेक्षा ५ ते १० रुपये जास्त आकारले जात आहेत. त्यामुळे तळीरामांच्या खिशाला कात्री बसत आहे.
दरम्यान, मागच्याच आठवड्यात राज्य शासनाने परदेशातून आयात होणाऱ्या विदेशी दारूचा कर ५० टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा करून उच्चभ्रू वर्गातील तळीरामांना दिलासा दिला. दुसरीकडे मात्र गरीब वर्गातील मद्यपींना देशी दारू मूळ किंमत ६० रुपयांऐवजी ७० रुपये दराने विक्री केली जात आहे.
विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाढीव दराबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही, तरी जिवती शहरातील देवालागुडा रोड वरील सरकारमान्य देशी दारू दुकानात ७० रुपयांना देशी दारूची विक्री केली जात आहे. तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग या प्रश्नी अनभिज्ञ असल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भरारी पथके नावालाच आहेत की काय? जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांसाठी भरारी पथकांची नेमणूक केलेली असते. बनावट दारू विक्रीबरोबरच परराज्यातून विनापरवाना दारू वाहतुकीवर पथकाकडून बारकाईने लक्ष ठेवले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिवती शहरातील देवलागुडा रोडवर देशी दारू दुकानात मूळ किमतीपेक्षा ५ ते १० रुपये जास्त दर आकारले जात असताना याकडे भरारी पथकांचे दुर्लक्ष कसे, हा प्रश्न विचारला जात आहे.
दर परवडत नसल्याने देशी दारूची विक्री कमी होत आहे. याबाबत तळीरामांना विचारणा केली असता, देशी दारूला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.ठरविलेल्या किमतीपेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागत असल्यामुळे आम्हाला ती परवडत नसल्याचे कारण ग्रामीण भागातील तळीरामांकडून सांगण्यात आले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...