Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / रेती घाटाचा लिलाव करुण...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

रेती घाटाचा लिलाव करुण सामान्य माणसाला रेती उपलब्ध करुण द्या

रेती घाटाचा लिलाव करुण सामान्य माणसाला रेती उपलब्ध करुण द्या

प्रशांत लोडे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन


 प्रतिनिधी .( कोरपणा):

राज्य शासनाने वाळू उपशावर बंदी घातली असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही रेतीबंदी मुळे कोरपना तालुक्यातील लहानमोठे गृहनिर्माणाचे बांधकाम रेती अभावी थांबले आहे

, यामुळे बांधकाम क्षेत्र संकटात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील सुमारे हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे.
सध्या राज्य शासनाने वाळू उपशावर बंदी घालण्यात आली आहे, अनेक ठिकाणी चोरीच्या मार्गाने वाळू उपलब्ध होत असली तरी अधिकृतपणे वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे कोरपना तालुक्यातील बांधकाम व्यवसाय जवळपास बंद झाला आहे.

परिणामी तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून बेरोजगारांचा रोजगार संकटात सापडला आहे, यामुळे तालुक्यात हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे, कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे, यामुळे या क्षेत्रावर मंदीचे सावट दिसत आहे. यातच आता शासनाच्या नव्या वाळू उपशाच्या धोरणाची भर पडली आहे. जिल्ह्यात वाळू बंद होऊन वर्षे उलटले तरी अद्यापही वाळू गटांचे लिलाव होताना दिसत नाही आहेत, वाळू गटांचे लिलाव न झाल्याने बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे हजारो बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, तरी जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाळू गटांचे लिलाव कसे व कधी होतील याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आधीच यंदा ओला दुष्काळ झाला आहे व पाणी टंचाई नाही पण वाळू अभावी अनेक ठिकाणांची बांधकामे बंद आहेत, यामुळे तालुक्यात सुमारे हजारा पेक्षा अधिक बांधकाम क्षेत्रात काम करून पोट भरणारे कामगार आहेत, वर्ष झाले तरी जिल्हा प्रशासनाने वाळूचे लिलाव का करत नाही याकडे सर्वच क्षेत्रातील कामगारांचे लक्ष लागले
आहेत तरी वाळूचे लिलाव न झाल्याने या मजुरांना कामे मिळत नाही. आठवड्यातून एक – दोन दिवस काम मिळते. मिळाले तरी मजुरी कमी मिळते. अशा एक ना अनेक समस्या बांधकाम कामगारांसमोर उभ्या टाकल्या आहेत.
बांधकाम कामगारांना ग्रामीण भागातून शहरात यावे लागते. रोजगारासाठी कंत्राटदाराकडे विनवण्या कराव्यात लागतात. मात्र वाळूच उपलब्ध नसल्याने तेही काम देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. बांधकाम कारागीरच नव्हे तर सेंट्रिंग काम करणारे, रंगकाम करणारे, फरशी बसविणारे, टाइल्स बसविणारे, स्लॅब टाकणारे, विटा वाहून नेणारे, रेती गाळणारे अशा अनेक क्षेत्रांमधील कामगार सध्या बेरोजगार अवस्थेत फिरताहेत. वाळू गटांना परवानगी देण्याबाबतचे जिल्हा पर्यावरण समितीचे अधिकार कमी करून राज्य समितीकडे हे अधिकार दिले गेले आहेत. राज्याची पर्यावरण समिती राज्यात केव्हा दौरा करेल व केव्हा वाळू गटांना परवानगी देईल याबाबत कुणीही खात्रीलायक सांगू शकत नसल्याचे आजचे चित्र आहे. जोपर्यंत पर्यावरण समितीची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत जिल्हा प्रशासन वाळू गटाचे लिलाव करू शकत नाही. म्हणून यावर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून रेती चालू करावी.

प्रत्येक गृहनिर्माण कार्यावर रेती उपलब्ध नसल्याने बांधकाम क्षेत्र ठप्प झाले आहे, हीच स्थिती संपूर्ण तालुक्याची आहे रेती केव्हा चालू होणार याची प्रतीक्षा बांधकाम कामगार करत आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...