Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / घरफोडी करणारे अट्टल...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार ब्रम्हपुरी पोलीसांच्या जाळयात

घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार ब्रम्हपुरी पोलीसांच्या जाळयात
ब्रम्हपुरी :- . दि . २१ / ०१ / २२ रोजी सकाळी ०५:०० वा दरम्यान पटेलनगर ब्रम्हपुरी येथे राहणारे श्री नितीन अग्रवाल हे यांचे पुतणीचे लग्न गोवा येथे असल्याने त्याकरीता ते त्यांचे संपुर्ण परीवारासह घराला कुलूप लावून गोवा येथे निघून गेले त्यांचे दिवानजी व मॅनेजर दि . २२/०१/२२ चे सकाळी ०७:०० वा दरम्यान घरातील लाईट बंद करण्यासाठी आले असता त्यांना घराचे समोरील दार उघडे दिसले . तसेच दाराचा कुलूप कोंडा तुटलेला दिसून आला . मॅनेजर यांनी नितीन अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून घरातील ऐवजाची पाहणी केली नितीन अग्रवाल यांनी सांगीतल्यानुसार व मॅनेजर ने शहानिशा केल्यानुसार घरातील ५५,००० रू नगदी व चांदीचे शिक्के असा मुद्देमाल चोरी गेल्याबाबतची तक्रार पो.स्टे ला दिली गेली घटनास्थळी तात्काळ भेट देवून अंगुली मुद्रा पथक व श्वान पथकास पाचारण करण्यात आले . घटनास्थळी मिळून आलेले भौतीक पुरावे च्या आधारे तपास सुरू केले असता तीन आरोपींनी मिळून गुन्हा केल्याचे प्राथमिकरित्या समजुन आले . घटनास्थळी मिळून आलेल्या भौतीक पुराव्याच्या आधारावर प्राथमीक तपासात साहील उर्फ माटया राजु आंबेकर वय २२ वर्ष रा . विठठल वार्ड निंबाळकर वाडी चंद्रपूर हयाने गुन्हा केला असावा असा दाट संशय आला . त्याला चंद्रपुर येथुन ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली . तसेच सदर गुन्हयात आरोपी अतुल विकास राणा वय २४ वर्ष रा . बंगाली कॅप शामनगर चंद्रपूर व रूशेष उर्फ कोबा उर्फ सुका चंद्रभान आत्राम वय २३ वर्ष रा . आदीवासी चौक वार्ड क ०४ विसापूर ता . बल्लारशाह जि चंद्रपूर यांनी मदत केल्याचे त्याने सांगीतले वरून पथक रवाना करण्यात आले . आरोपी रूशेष उर्फ कोब्रा उर्फ सुका चंद्रभान आत्राम याला बल्लारशा येथून तर आरोपी अतुल विकास राणा याला चंद्रपुर शहर परीसरातून ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मिळून गुन्हा केल्याचे कबुल केले नमूद आरोपीतांना अटक करून त्यांचेकडुन सदर गुन्हयात चोरी गेलेले चांदीचे सिक्के तसेच ईतर मुददेमाल जप्त करण्यात आला . सदर आरोपी हे पोलीस अभिलेखावरील सराईत घरफोडी व चोरीचे गुन्हेगार असून परीसरात तसेच जिल्हयात त्यांचेवर अनेक घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत . सदर गुन्हयाचा तपास मा . पोलीस अधिक्षक साहेब चंद्रपूर मा . अपर पोलीस अधिक्षक साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी सा . ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव , सहायक पोलीस निरीक्षक श्री आशिष बोरकर , ना.पो.शि. मुकेश गजबे , पो.शि. अजय नागोसे , पो . शि . प्रमोद सावसाकडे यांचे पथकाने केली असून गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री आशिष बोरकर हे करीत आहेत . पो.स्टे ब्रम्हपुरी कडून नागरीकांनी बाहेरगावी जातांना कोणती काळजी घ्यावी याबाबत महत्वपुर्ण सूचना जाहीर केल्या आहेत सदर पत्रकाद्वारे सुद्धा नागरीकांना आवाहन करण्यात येते की , बाहेरगांवी जातांना पोलीस स्टेशन अथवा शेजाऱ्यांना माहीती देवून सतर्कता बाळगावी .

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...