Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / शेतकऱ्यांचा तांदूळ...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

शेतकऱ्यांचा तांदूळ सांगणाऱ्या पोलिसांनीच पकडले वाहन ।। दोन वाहनासह १०८ बोऱ्या तांदूळ जप्त; तहसिलदाराची कारवाही सुरू.

शेतकऱ्यांचा तांदूळ सांगणाऱ्या पोलिसांनीच पकडले वाहन ।। दोन वाहनासह १०८ बोऱ्या तांदूळ जप्त; तहसिलदाराची कारवाही सुरू.

तहसिलदाराची कारवाही सुरू.

राजुरा (प्रतिनिधी ): मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली तांदूळ तस्करी ही अवैद्य नसून तो तांदूळ शेतकऱ्यांचा असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या विरुर (स्टे.) पोलिसांनी अखेर तांदूळ तस्करी करणाऱ्या दोन वाहनांना तांदळासह ताब्यात घेतले असून समोरील कारवाही करण्यासाठी सदर प्रकरण राजुरा तहसीलदार यांच्याकडे पाठविले आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी अन्न व पुरवठा विभाग करीत आहे, यामुळे मात्र विरुर पोलिसांचे पितळ उघडे झाले असून या तस्करांनावर कोणती कारवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विरुर (स्टे.) परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैद्य धंद्याचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहे. यात गो-तस्करी, तांदूळ तस्करी, अवैद्य गौण खनिज, लाकूड तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून याला राजकीय पाठबळ असल्याने कोणतीही कर्व्हाई होताना दिसून येत नाही. तेलंगणा राज्यात मोफत मिळणारा स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ रेल्वेनी विरुर (स्टे.) येथे येत असून हाच तांदूळ स्थानिक तस्कर दहा ते बारा रुपये किलोने घेत आहे. रेल्वे स्टेशन येथून चारचाकी वाहनांनी तांदूळ नेऊन साठवणूक केली जाते व हाच तांदूळ ब्रम्हपुरी, गोंदिया, भंडारा येथे पाठवून त्या ठिकाणी या तांदळावर प्रक्रिया करून या तांदळाला दुसरे लेबल लावून खुल्या बाजारात जास्त दराने विकल्या जात आहे. मात्र स्थानिक विरुर (स्टे.) पोलिस तस्करी होत असलेल्या तांदळाला चौकशी केल्यानुसार शेतकऱ्यांचा तांदूळ असल्याने वैद्य आहे यामुळे कारवाही करता येत नाही असे सांगणाऱ्या पोलिसांनीच (दि.३०)  तांदूळ तस्करी करीत असलेल्या ललित कुमार  सोनी यांचे ६४ बोरी तांदूळ व प्रकाश लक्ष्मन कोमटपल्लीवार यांचे ४४ बोरी तांदूळ असलेले वाहन पोलीसांनी ताब्यात घेतले आहे, समोरील कारवाहीकरीता तहसीलदार राजुरा यांच्याकडे पाठविले आहे.

पोलिसांच्या या कारवाहीमुळे विरुर येथील पंधरा ते वीस तांदूळ तस्करांकडून आजपर्यंत दररोज शेकडो वाहनातून होत असलेल्या तस्करीचे वाहन का सोडले असा प्रश्न निर्माण होत आहे. या तस्कारांचे रॅकेट खूप मोठे असून यात जिल्हा अन्न व पुरवठा विभाग, बाजार समिती व स्थानिक पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वपूर्ण असून जाणीवपूर्वक पोलिस याकडे दुर्लक्ष  करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.

  • वृत्तपत्रात प्रकाशित होत सलेल्या बातम्यांमुळे तांदूळ तस्करांनी मार्ग बदलवीला आहे, रेल्वे ऐवजी रस्त्यांनी सिरपुर मार्ग अन्नूर, अंतरगाव येथे आज दिवसभर खरेदी सुरू होती तेलंगाना मध्ये आत्ता तांदूळ मोफत दिल्या जात आहे एका व्यक्तीला दहा किलो आणि हा शासकीय कंट्रोलचा माल महाराष्ट्र राज्यात बारा रुपये किलो नी घेऊन त्यावर प्रक्रिया करून बेचाळीस रुपये प्रति किलो विकण्यात येत आहे यामध्ये शासकीय अधिकारी यांचा हात असून राजकीय नेते व चंद्रपूर जिल्हा पुरवठा अधिकारी हे मात्र मुंग गिळून बसले आहे यासोबत महाराष्ट्र मधील कंट्रोल चा तांदूळ सुधा मार्केट मध्ये विकल्या जात आहे या मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ची भूमिका. सुद्धा संशयास्पद असल्याचे बोलल्या जात आहे. आता सर्व स्तरातून तांदूळ तस्करी करणाऱ्या वर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.


राजुरा विरुर पोलिसांनी दोन गाड्या तांदूळ असलेल्या पकडल्या असून त्याचा तपास करण्यासाठी राजुरा तहसिलकडे पत्र पाठविले आहे, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे वाहन मालकाचे बयान घेऊन कारवाही केली जाणार आहे, सबळ पुरावे मिळाले तर कारवाही नक्की केली जाईल : हरीश गाडे, तहसीलदार राजुरा

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...