आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती (प्रतिनिधी) :शेतकऱ्यांचे थकीत विद्युत बिल असल्याने महावितरणकडून त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे सत्र सुरू आहे. कोरपना तालुक्यातील नांदा, बिबी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीतील विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला. शेतकऱ्यांवर असलेले अस्मानी-सुलतानी संकट यामुळे विज बिल भरणे प्रत्येक शेतकऱ्यांना कठीण होते. त्यातच सोयाबीनचे दर घटल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यासंदर्भात कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज खंडित करू नये या मागणीसाठी शेतकरी संघटना युवा आघाडी तर्फे गडचांदूर येथील महावितरणचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी संघटना युवा आघाडीच्या निवेदनाची दखल घेत शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार नाही असे महावितरने आश्वासित केले. विद्युत बिल भरण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
भारतीय वीज कायद्यातील कलम ५६ (१) अन्वये थकित वीज पुरवठा खंडित करणे अगोदर १५ दिवसांची नोटीस संबंधित शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. मात्र तशी कोणतीही कायदेशीर नोटीस न बजावता संपूर्ण जिल्ह्यात बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्याचप्रमाणे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून अन्नसुरक्षा कायद्यातील तरतुदींचे देखील उल्लंघन होतांना दिसते, ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. महावितरणच्या बेकायदेशीर कृती विरोधात गरज पडल्यास संविधानिक मार्गाने लढा उभारला जाईल असे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनाची महावितरणने दखल घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी शेतकरी संघटना युवा आघाडीचे रत्नाकर चटप, स्वप्निल झुरमुरे, दिलीप देवाळकर, उदय काकडे, मुरलीधर झुरमूरे, महादेव एकरे, मारुती देरकर, देवराव गिरडकर, सुनील भोयर आदींची उपस्थिती होती.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...