Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या कामगारांना एसीसी कंपनीकडून षडयंत्र रचून मारपीट.

हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या कामगारांना एसीसी कंपनीकडून षडयंत्र रचून मारपीट.

पत्रकार परिषदेतून सफेद झेंडा कामगार संघटनेचा आरोप.

 घुग्गुस:  रविवार 30 जानेवारी रोजी 12 वाजता दरम्यान नकोडा येथील आठवडी बाजारा जवळ सफेद झेंडा कामगार संघटनेच्या पेंडाल मध्ये आंदोलन स्थळी आंदोलन कर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या कामगारांना एसीसी कंपनीकडून षडयंत्र रचून मारपीट केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

दिनांक 27 जानेवारी पासून चोरी झालेला पीएफ व अन्य मागण्या पूर्ण केल्या नाही म्हणून कामबंद आंदोलन कामगारांतर्फे सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून शांतीपूर्वक उभारण्यात आले.

  दिनांक 28 जानेवारी रोजी एसीसी कंपनीचे काम ठप्प पडल्यामुळे एसीसी कंपनीने हुकूमशाही व तानाशाही तसेच गुंडप्रवृत्तीचा विचार मनात आणून  षडयंत्र रचून कामगारांचे आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी गुंड पाठवून आंदोलन करत असलेल्या कामगारांना दांड्याने खुर्चीने बेदम मारहाण केली.
  त्यामुळे सुरेश पाईकराव अध्यक्ष सफेद झेंडा कामगार संघटना व एसीसी कामगारांच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आंदोलन फोडणाऱ्या एसीसी कंपनीची चौकशी करुन या कंपनीवर व मारहाण करणाऱ्या गुंडावर कडक कारवाई करुन कामगारांना न्याय देण्यात यावा.

सुरेश पाईकराव यांना एसीसी कंपनीचे व्यवस्थापक पुष्कर चौधरी यांनी रामदास पवार यांनी फोन करुन सांगीतले कि तुमची बैठक दि,13 जानेवारी 22 रोजी दुपारी 2, वाजता करण्यात येत आहे मी सुरेश मल्हारी पाईकराव, व ईश्वर बेले,अशोक आसमपल्लीवार, दत्तावाघमारे,अशोक भगत, नितिन कन्नाके,सोबत एसीसी येथे मिटिंग मध्ये गेलो असता जवळ पास १ ते १:३० तास चर्चा झाल्यानंतर मला पुष्कर चौधरी यांनी 5 मिनिट तुमचा सोबत चर्चा करण्याची आहे, मी म्हटल कि जे काही चर्चा करण्याची आहे सर्वांन समोर करण्यात यावी, पुष्कर चौधरी यांनी आणखी आग्रह केला व आफिस च्या बाहेर नेऊन गाडी पार्किंग जवळ घेवून गेला तिथे मला पुष्कर चौधरी यांनी तुला 60 ते 70 लाख रुपये दुॅंगा और मकान बनाके दूॅंगा गाडी खरेदी करके दुॅंगा इलेक्शन के लिये पैसा दुॅंगा विधानसभा सिट तुम लढो जितना पैसा लगता है मै कंपनी से दुॅंगा खाली ये पीएफ चोरी वाला मॅंटर जरा बंद कर दो, मी पुष्कर चौधरी यांना म्हटले की तुम्ही फक्त कामगारांचा चोरी झालेला पीएफ,व ,26 ड्यूटी मेडिकल कौंसिलिटी, व कामगार म्हटल्या प्रमाणे ठेकेदार त्यांना द्या मला आणखी काहिही नाही पाहिजे,मी विकल्या गेलो नाही म्हणून कंपनीचे पुष्कर चौधरी काँग्रेस नेते रोशन पचारे, शहर अध्यक्ष राजु रेड्डी,यांनी गुंडप्रवृत्तीचे षडयंत्र रचुन आंदोलन करत असलेल्या कामगारांना मारपिट केली,यांच्या व कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करुन शांती व सुव्यवस्था भंग करुन वातावरण चिघडण्याच्या प्रर्यंत्न केला अशा लोकांनवर कडक कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कामगारांना न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. पत्रकार परिषदेला अनेक कामगार उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...