Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / यशाचे शिखर गाठायचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

यशाचे शिखर गाठायचे असेल तर पाय भरकटू देऊ नका...

यशाचे शिखर गाठायचे असेल तर पाय भरकटू देऊ नका...

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापुरावजी मडावी यांचे प्रतिपादन ।। कुकुडसाथ येथे सल्ला शक्ती अनावरण व प्रबोधन मेळावा संपन्न.

कोरपना : समुद्रात भरकटलेल्या जहाजाला जशी दिशा शोधावी लागते, त्याचप्रमाणे गोंडीयन समुदायाला विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी सृजनशिल मार्गदर्शनाची गरज आहे. विकासाचा मार्ग खरतड असला तरी अशा प्रबोधनामधूनच यशाची एक-एक पायरी चढता येते. आपणास यशाचे शिखर गाठायचे असेल तर पाय व मन भरकटू देऊ नका, कारण आपण स्पर्धेच्या व डिजिटल युगात वावरत आहोत. त्यामुळे मन व चित्त एकत्र ठेवून शिक्षणाचे सातत्य टिकविल्यास तुम्हाला तुमच्या ध्येया पासून कुणीच परावृत्त करू शकत नाही असे मौलिक मार्गदर्शन गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापुरावजी मडावी यांनी कुकुडसाथ येथिल कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात केले.

गोंदोला- सामाजिक उपक्रमांच्या पिसाना समाजलासी म्हणजे जगावे समाजासाठी हा उदात्त हेतू समोर ठेवून गोंडीयन समाज मंडळ कुकूडसाथ यांनी सल्लेर-गांगेर शक्तीपीठाचे अनावरण कार्यक्रमा निमित्त समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता.

अध्यक्षस्थानी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापुरावजी मडावी तर उद्घाटक म्हणून कळमनाचे सरपंच तथा काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्राम आरोग्य सेना फॉउंडेशन चे संस्थापक डॉ. प्रविण येरमे, माजी समाजकल्याण सभापती जि. प. चंद्रपूर निलकंठराव कोरांगे, भारत आत्राम गौरव भोयर,सरपंच वंदनाताई चवले, उपसरपंच आस्वले, पो. पा. जितेंद्र मुठ्ठलकर, तंटामुक्ती अध्यक्ष रंजन लखमापुरे, गाव सुधार समिती अध्यक्ष वासुदेवजी बोधे, प्रतिष्ठीत नागरिक यशवंतराव जी चवले, युवा नेतृत्व किशोरजी निब्रड प्रमुख पाहुणे म्हणून लिंगोमंचावर विराजमान होते.

सामाजिक बांधिलकी काय असते हे कुकूडसाथ ग्रामवासीया कडून शिकले पाहीजे. जगावे समाजासाठी यांचा प्रत्येय इथे पहायला मिळाला त्याबद्दल कार्यक्रम अध्यक्ष मडावी यांनी ग्रामस्थांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.

पिसाना समाजलासी या वाक्याला सार्थक ठरविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असून, समाजाची संस्कृती, ऐक्य, सामाजिक भावना वृध्दींगत व्हावी या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्रास्ताविकेतून शंकर आत्राम यांनी मांडले.

संचालन व आभारप्रदर्शन श्री. गर्जेहर यांनी केले.

यशस्वीतेसाठी शंकर आत्राम, देवाजी आत्राम, भाऊराव सोयाम, प्रमोद आत्राम, मिनाताई आत्राम, संदिप परचाके, दौलत टेकाम, विक्की आत्राम, सुरज सोयाम, नितेश आत्राम, अजय आत्राम, सौरभ आत्राम यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...