Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / उद्या रामपूर येथे रास्ता...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

उद्या रामपूर येथे रास्ता रोको आंदोलन..!

उद्या रामपूर येथे रास्ता रोको आंदोलन..!

धुळीच्या विरोधात रामपूरची जनता रस्त्यावर; तात्काळ काम सुरू करा.

राजुरा : मागील अनेक महिन्यापासून रस्ता बांधकामाच्या नावावर बांधकाम विभागाची वेळकाढूपणा व या रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने त्रस्त रामपूरवासीय जनता रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करून रामपूर ते गोवरी रोड माता मंदिर पर्यन्तच्या मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरू करने, दिवसातून तीनदा रोडवर पाणी मारणे व जड वाहतूक बंद करणे या मागण्यांना घेऊन रामपूर ग्रामपंचायत व जनता यांच्या पुढाकारातून उद्या (दि. २९) गोवरी रोड सास्ती टी-पॉईंट रामपूर येथे  १० वाजता रास्ता रोको आंदोलन करीत आहे.

रामपूर ते गोवरी या मुख्य मार्गाचे काम मागील काही महिन्यांपूर्वी चालू केले परंतु अर्धवट काम केले आणि आता सहा ते सात महिन्यापासून काम बंद असून या बाबत बांधकाम विभागाला बऱ्याचदा विचारणा केली असता लवकरच काम चालू होऊन काम पूर्ण होणार हे उत्तर नित्याचेच आहे. या मार्गावर रोज अनेक जड वाहनाद्वारा वाहतूक होत असते आणि याच मार्गाने परिसरातील गावातील लोक ये जा करावी लागत असून या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.  वस्तीतील घरांमध्ये धूळ जात असल्याने येथील नागरिकांचे जगणे कठीण झाले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ मोठे जीव घेणे खड्डे पडलेले असल्यामुळे दुचाकी वाहन चालविणे सुद्धा अवघड झालेले आहे दुचाकी वाहनांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बरेचदा अपघात होऊन अनेकाना आपले अवयव गमवावे लागले असून अनेकांची जीवित हानी झालेली आहे.

रस्ता बांधकाम करणे व धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज तीन वेळा पाणी मारण्यासाठी बांधकाम विभागाकडेनिवेदन दिले मात्र अजून पर्यंत याचा काहीही फायदा न झाल्याने आज ग्रामपंचायत रामपूर व समस्त रामपूर ग्राम वासीय यांनी गोवरी रोड, सास्ती टी-पॉईंट रामपूर येथे रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. रास्ता रोको करूनही मागण्या पूर्ण न झाल्यास रोज दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत जड वाहतूक बंद करून निषेध करण्याचा इशारा सरपंच वंदनाताई गौरकार यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...