आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
आज दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी सफेद झंडा कामगार संघटना ACC कंपनी शाखा घुग्घुस अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव व ACC कामगारांच्या माध्यमातून आज काम बंद आंदोलन करण्यात आले असुन या कामबंद आंदोलन करण्याचे कारण की ACC कंपनीतील न्यु पॅकिंग हाऊस प्लॉंट कामगार यांचा गेल्या दहा वर्षांपासून ठेकेदारांनी PF कटोती करून कामगारांच्या PF खात्यात तिन महिन्याचा कधी दोन महिन्याचा PF जमा करायचा व तसेच मेंटेनंन्स कामगारांचा अद्याप PF देखील भरलेला नाही ह्या सर्व कामगारांना घेऊन दि. 5 जुन 2021 रोजी घुग्घुस येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव व ACC कामगारांना घेऊन घुग्घुस आठवडी बाजारात रंगमंच येथे उभारण्यात आले होते हे आंदोलन चौदा दिवस सुरू होते चौदाव्या दिवस पोलीस स्टेशन घुग्घुस पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे साहेब यांच्या समक्ष ACC कंपनीचे व्यवस्थापक यांनी चोरी झालेला PF व मागण्यासाठी 31 जुलै 2021 रोजी पर्यंत आम्ही चोरी झालेला PF चा भरणा करणार व अन्य मागण्या पूर्ण करुन देणार असे घुग्घुस ठाणेदारा समोर लेखी ACC कंपनी तर्फे देण्यात आले होते परंतु एक दोन महिने व सतत सात ते आठ महिने ओलांडून सुध्दा चोरी झालेला PF अद्याप बरोबर भरला गेला नाही व ज्या ठेकेदाराकडे हे कामगार काम करत होते त्या ठेकेदारावर ACC कंपनीने कोणतीही कारवाई न करत तो ठेकेदार काम सोडून पळून गेला व ACC कंपनीने दुसर्या ठेकेदाराला ते काम देऊन त्या ठेकेदारांनी सुध्दा सुरुवातीला कामगारांचा पगार देखील बरोबर वेळेवर न करता त्या पगारासाठी सुध्दा कामगारांना आंदोलन करावे लागले तेव्हा त्या ठेकेदारांनी कामगारांचा पगार दिला व कामगारांचा लक्षात आले की ज्या नवीन ठेकेदाराकडे आपल्या बदलण्यात आले आणि त्यांची जॉइनींग आताची दाखवत आहे. तर कामगारांत रोष व्यक्त केला आपण या कंपनीत गेल्या दहा वर्षांपासून काम करत आलो आहोत आणि आज या कंपनीने आपल्याला नवीन जॉइनींग दाखवून आणखी आपल्याला कुठे बाहेर लोन किंवा अन्य सुविधा मिळणार नाही. हे देखील रोष निर्माण झाला.
ACC कामगारांनी स्वतःची सफेद झंडा कामगार संघटना स्थापन करुन या संघटनेचा माध्यमातून ACC कंपनीला मागणी केली की चोरी केलेला PF हा कामगारांच्या खात्यात जमा करा व ठेकेदारी पद्धत बंद करा दहा ते वीस वर्षापासून जो कामगार काम करत आहेत ह्या कामगारांना नियमित करा जने करून ठेकेदार हा कामगारांचा PF चोरी करणार नाही व अन्य कंपनीचा व अन्य फॅसिलिटी पासुन वंचित राहणार नाही म्हणून आज दिनांक 27 जानेवारी 2022 पासून ACC सर्व कामगारांचे वेतन, मेडिकल, बोनस, 26 डय़ुटी, 8 PL, CL, SICK, सर्व कामगारांचा पाल्यांना शिक्षण 50% सुट व अन्य मागण्यांसाठी बेमुदत धरना आंदोलन हे ACC कंपनीचा विरोधात करण्यात आले आहे जो पर्यंत मागण्या पूर्ण व चोरी केलेला PF भरणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील व या आंदोलनात जे काही नुकसान भरपाई होईल व जो कामगार या आंदोलनामध्ये सहभागी होणार त्या कामगारांचा तितके दिवसांचा पगार सुध्दा या ACC कंपनीला द्यावे लागणार असे सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव अध्यक्ष - सफेद झंडा कामगार संघटना यांनी सांगितले या वेळेस उपाध्यक्ष - ईश्वर बेले, सचिव - शरद पाईकराव, संघटन मंत्री (अशोक आसमपल्लीवार, अशोक भगत, दत्ता वाघमारे, शिवदास सदाफळे, नितीन कन्नाके, धम्मा कांबळे, व अन्य कामगार उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...