Home / चंद्रपूर - जिल्हा / पालकमंत्री विजय वडेट्टीवार...

चंद्रपूर - जिल्हा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि.24 जानेवारी : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार दि. 25 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथे आगमन व शहरातील वडगाव प्रभाग 8 मध्ये खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या जेपी सुपर बाजार ते श्री. मुलानी गजानन महाराज सिमेंट काँक्रीट रस्ता व लक्ष्मीनगर सर्वे नं.13/2 मधील जागेच्या सौंदर्यीकरण व विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. सकाळी 11.45 वाजता चंद्रपूर शहरातील महाकाली (जोडदेऊळ) प्रभाग क्र. 12 (जोडदेऊळ, पठाणपुरा) मध्ये खनिज निधीअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या जोडदेऊळ विठ्ठल रुक्माई मंदिर सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली  बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12.30 वाजता शहरातील बंगाली कॅम्प प्रभाग क्रमांक 4 मधील खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या महिला शक्ती क्रिडांगणाला वॉल कंपाऊंडचे बांधकाम व संविधान चौक (राजीव गांधी नगर) ते हेल्थ फार्मसी डी.आर.सी रोड पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.15 वाजता चंद्रपूर शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट प्रभाग क्र. 6 मध्ये खनिज निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या श्री. मनोज परसराम ते श्री. विश्वकर्मा यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व श्री. सुनीलराव अंबाला यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी 2 वाजता विवेक नगर तुकुम प्रभागांमध्ये खनिज निधीअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या श्री साजिद खान ते ए.एच.शेख, अनवर शेख ते कपिल कुरेशी आणि श्री. वरभे ते राहुल ट्रेडर्स शॉपपर्यंत काँक्रीट रोड व नाली बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत संबंधित विभागातील विकास कामांचा आढावा बैठक. सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावे एका तालुक्यात येतात व त्यांची ग्रामपंचायत दुसऱ्या तालुक्यात येत असल्याने एकाच तालुक्यात ठेवण्याबाबत आढावा बैठक. सायंकाळी 4.30 वाजता नियोजन भवन सभागृह येथे जिल्हा दिव्यांग अखर्चित निधी मधून नवीन योजना घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर शहरातील कॅन्सर हॉस्पिटल संदर्भात कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या कामांच्या प्रगतीबाबत आढावा बैठक. सायंकाळी 5.30 वाजता चंद्रपूर शहरातील कॅन्सर हॉस्पिटल संदर्भात कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या कामांच्या प्रगतीबाबत कामाची पाहणी. सायंकाळी 6.30 वाजता होटेल सिद्धार्थ प्रेमियर, चंद्रपुर येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. रात्री 8.30 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम.

बुधवार, दि. 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7:40 वाजता गांधी चौक,चंद्रपुर येथे पक्षाच्यावतीने आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित. सकाळी 9.15 वाजता पोलीस ग्राउंड, चंद्रपूर येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12 वाजता चंद्रपूर येथून सावली कडे प्रयाण. दुपारी 1 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 2.15 वाजता पालकमंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय, सावली येथे नगरपंचायत सावली येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 3.15 वाजता बोथली ता. सावली येथे आगमन व प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत बोधली ते घेडेवाही ते सिंडोला रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित.  सायंकाळी 4 वाजता जिबगाव ता.सावली येथे आगमन व तालुक्यातील हिरापूर, बोथली, सावली, उसेगाव, जिबगाव, हरंबा, साखरी, लोंढोली, कढोली, कापसी, व्याहाड बुज रस्त्यावर मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 5.30 वाजता वाघोली बुटी, ता. सावली येथे आगमन प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत व्याहाड बु. ते वाघोली ते सामदा बु. रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 6:30 वाजता वाघोली बुटी, ता. सावली येथून गडचिरोली कडे प्रयाण.

गुरुवार दि. 27 जानेवारी 2020 रोजी, सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिदेंवाही येथे आगमन व विश्रामगृह विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, सिदेंवाही येथे नगरपंचायत सिंदेवाही येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12.30 वाजता चारगाव (बेडगे) ता. सिंदेवाही येथे आगमन व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मेंढामाल ते जिवनापूर रस्त्यांचे बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 1:30 वाजता किन्ही ता. सिंदेवाही येथे आगमन व स्थानिक विकास निधी अंतर्गत गुरुदेव सांस्कृतिक सभागृह लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. दुपारी 3 वाजता कळमगाव ता. सिंदेवाही येथे आगमन व मुरमाडी, कळमगाव, कुकूडहेटी येथे आगमन व उमा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 4.30 वाजता वाकल ता. सिंदेवाही येथे आगमन व वाकल जामसाळा रस्त्यावर उमा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. तसेच खनिज विकास निधी अंतर्गत बौद्ध समाज मंदिर लोकार्पण सोहळा व अंगणवाडी लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. सायंकाळी 5.30 वाजता वाकल ता. सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण.
 

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...