आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
कोरपना (तालुका प्रतिनिधी): चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शेतकरी कमलाकर ठाकरे व अन्य असंख्य शेतकरी यांनी दत्तकृषी केंद्राचे संचालक राजु ऊर्फ प्रदिप मनिराम वैद्य (दत्त कृषी केंद्र शंकरपुर ) यांच्या विरोधात बोगस रासायनिक खते विक्री करुन आर्थीक नुकसान करुन फसवनुक केल्याची तक्रार कृषी विभागाकडे दाखल केली होती. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महेशभाऊ हजारे यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब व चंद्रपूर पोलिस अधिक्षक साहेब यांच्याकडे लेखीनिवेदनाद्वारे चौकशी करन्याची विनंती करण्यात आली होती,
त्यानंतर या प्रकरणाची जिल्हा कृषी विभाग चंद्रपुर मार्फत शासकिय लँब अमरावती येथे रासायनिक खतांचे नमुने पाठवले असता रासायनिक घटकांचा अभाव अढळल्याने रासायनिक खते बोगस असल्याचे सिद्ध झाले.
त्यामुळे पोलीस स्टेशन शंकरपुर येथे कृषि संचालकावर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले असुन पुढील तपास सुरु आहे. या कृषी केंद्राच्या बोगस रासायनिक खतांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले असून प्रती शेतकरी अंदाजे लाखो रुपये नुकसानित गेला आहे,परंतु कुठलीही नुकसान भरपाई या पिढीत शेतकऱ्यांना दत्तकृषी केंद्राकडुन मिळाली नसुन, ऊलट तक्रारकर्ते शेतकरी कमलाकर ठाकरे यांच्यावर दबाव टाकत मानसीक त्रास देऊन समाजामध्ये पत-प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न दत्तकृषी केंद्राचे संचालक राजु वैद्य व त्यांच्या पत्नी सौ.स्वाती राजु वैद्य यांच्याकडुन सुरु झाला आहे.
काही दिवसापुर्वी सौ.स्वाती वैद्य यांनी पोलीस स्टेशन शंकरपुर येथे तक्रारकर्ते कमलाकर ठाकरे यांच्या विरुद्ध खोटी तक्रार देऊन स्वताच्या पतिला वाचवन्यासाठी कायद्याचा गैरवापर केला जात आहे. तक्रारकर्ते कमलाकर ठाकरे व ईतर शेतकरी भयभित झाले असुन भविष्यात कटकारस्थान करुन खोटे आरोप या वैद्य कुटुंबाकडुन केले जाऊ शकतात अशी भिती तक्रारकर्ते शेतकऱ्यांना वाटत असल्याचे प्रहारचे महेशभाऊ हजारे यांना सांगीतले..
तेव्हा तात्काळ प्रहारचे महेशभाऊ हजारे यांनी आपले सहकारी अशिद मेश्राम प्रहारसेवक चिमुर व अँड.विनोद मुंजेवार यांना घेऊन शंकरपुर येथे गेले व सर्व शेतकऱ्यांना सांगीतले की, प्रहार जनशक्ती पक्ष तुमच्या सोबत खंबीरपणे ऊभा आहे व शंकरपुर येथील पोलीस चौकी येथे लेखीतक्रार दिली. काल दि.24/01/2022 रोजी मा.जिल्हाधिकारी व मा.पोलीस आधिक्षक चंद्रपुर यांना लेखीनिवेदनाद्वारे या प्रकरनात गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली व सुडभावनेतुन वैद्य कुटुंबाकडुन यापुढे कुठलीही आर्थीक, शारिरीक, व जिवितहाणी होऊ नये म्हणुन या संबधीत प्रकरनाची चौकशी करावी अशी मागनी प्रहारने केली.
दुर्दैवाने चुकिची घटना घडली व तक्रारकर्ते शेतकऱ्यांना काही त्रास झाला तर संबधीत प्रशाषण याला जबाबदार असेल असा ईशारा महेशभाऊ हजारे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.
सोबत कमलाकर ठाकरे जवराबोळी , चंदु गजघाटे - जवराबोळी ,सुरेश भिवनकर- शंकरपूर ,पवन गजघाटे- जवराबोळी ,ज्ञानेश्वर अग्रवाल- हिवरा,कुल राऊत- जवराबोळी सर्जेराव ठाकरे- जवराबोळी आशिष ठाकरे- जवराबोळी ,किशोर चौधरी- चिचाळा ,राहुल ठाकरे- जवराबोळी ,योगेश माळवे-जवराबोळी ,नारायण राऊत-जवराबोळी सर्व शेतकरी ऊपस्थीत होते.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...