Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / अतिक्रमणधारकांनाचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

अतिक्रमणधारकांनाचा मोहीम न थांबल्यास सामुहिक विष प्राशन करन्याचा इशारा

अतिक्रमणधारकांनाचा मोहीम न थांबल्यास सामुहिक विष प्राशन करन्याचा इशारा

मांडवा येथील वन जमिनीवरील अतिक्रमण हटाव प्रकरण

मंगेश दिलीप तिखट (कोरपना प्रतिनिधी): तीन पिढ्यांचे पुरावे उपलब्ध नसल्याचे सबबी वरून मांडवा येथील अतिक्रमण धारकाचे पट्टे नाकारण्यात आले. शुक्रवारला वन विभागातर्फे अतिक्रमण हटाव मोहीमेचा बडगा उगारण्यात आला. ही मोहीम न थांबवल्या गेल्यास सामूहिक विष प्राशन करून आत्मदहन करण्याचा इशारा अतिक्रमण धारक शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील राजुरा हा उपविभाग  स्वातंत्र्यापूर्वी निजाम राजवटीच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे या ठिकाणी रेकॉर्ड अभावी तीन पिढ्या चे पुरावे मिळणे कठीण बाब ठरते आहे. या कारणाने पुराव्याअभावी दावे सिद्ध करता येत नाही.  हैदराबाद रियासत अधिसूचना ८ ऑक्टोबर १९५३ नुसार फसली नकाशा व महसूल व वन विभागाच्या नकाशा मध्ये वनक्षेत्राच्या नोंदीत तफावती आहे. 

या अनुषंगाने  राजुरा उपविभागातील समस्या लक्षात घेता ही तीन पिढ्यांची अट रद्द करून गैर आदिवासींना नियमित करून पट्टे देण्यात यावे.तसेच मांडवा येथील अतिक्रमण हटाव मोहिम त्वरित थांबवण्यात यावी. बिगर शेती धारक शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी ही जमीन उपलब्ध करून द्यावी.  त्यामुळे आमची उपासमार होणार नाही. आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही असे मत अतिक्रमण धारक शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. 

ही मोहीम न थांबवल्यास येत्या ३१ जानेवारीला वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिद अली, कार्तिक गोणलावार, अतिक्रमण धारक संघर्ष समिती चे सुधाकर झुलकटीवार , रामभाऊ कोल्हे, बाळकृष्ण काळे, संतोष भुसे, चंदन नशिने यांनी पत्रपरिषदेत दिला आहे.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...