आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
कोरपना : तीन पिढ्यांचे पुरावे उपलब्ध नसल्याचे सबबी वरून मांडवा येथील अतिक्रमण धारकाचे पट्टे नाकारण्यात आले. शुक्रवारला वन विभागातर्फे अतिक्रमण हटाव मोहीमेचा बडगा उगारण्यात आला. ही मोहीम न थांबवल्या गेल्यास सामूहिक विष प्राशन करून आत्मदहन करण्याचा इशारा अतिक्रमण धारक शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील राजुरा हा उपविभाग स्वातंत्र्यापूर्वी निजाम राजवटीच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे या ठिकाणी रेकॉर्ड अभावी तीन पिढ्या चे पुरावे मिळणे कठीण बाब ठरते आहे. या कारणाने पुराव्याअभावी दावे सिद्ध करता येत नाही. हैदराबाद रियासत अधिसूचना ८ ऑक्टोबर १९५३ नुसार फसली नकाशा व महसूल व वन विभागाच्या नकाशा मध्ये वनक्षेत्राच्या नोंदीत तफावती आहे. या अनुषंगाने राजुरा उपविभागातील समस्या लक्षात घेता ही तीन पिढ्यांची अट रद्द करून गैर आदिवासींना नियमित करून पट्टे देण्यात यावे.तसेच मांडवा येथील अतिक्रमण हटाव मोहिम त्वरित थांबवण्यात यावी. बिगर शेती धारक शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी ही जमीन उपलब्ध करून द्यावी.
त्यामुळे आमची उपासमार होणार नाही. आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही असे मत अतिक्रमण धारक शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. ही मोहीम न थांबवल्यास येत्या ३१ जानेवारीला वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिद अली, कार्तिक गोणलावार, अतिक्रमण धारक संघर्ष समिती चे सुधाकर झुलकटीवार , रामभाऊ कोल्हे, बाळकृष्ण काळे, संतोष भुसे, चंदन नशिने यांनी पत्रपरिषदेत
दिला आहे.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...