वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): शुक्रवार 21 जानेवारी रोजी घुग्घुस आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमित बोरकर यांनी तलाठी कार्यालयात निवेदन देऊन घुग्घुस शहरातील नवीन ग्रामीण रुग्णालय शासकीय इमारतीच्या बांधकामात वापरण्यात येत असलेल्या रेती साठ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
घुग्घुस येथील चिंचोली घाट, घुग्घुस घाट, नायगाव घाट या रेती घाटावरून अनेक महिन्यापासून अवैध रेती जोमाने सुरु आहे काही दिवसापूर्वी चार ते पाच ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते तरी सुद्धा रेती तस्करी सुरु आहे. मंडळ अधिकारी येऊन नदीच्या रस्त्यावर जेसीबी मशीनने खड्डे खोदून रस्ता बंद करण्यात येते व लगेच दुसऱ्या दिवशी नवीन मार्ग रेती तस्करांन कडून सुरु करण्यात येते. गोर गरिबांना घरे बांधण्यासाठी रेती मिळत नाही आहे अवैध रेती तीन ते चार हजार रुपयात विकल्या जाते शासनाचा लाखोचा महसूल बुडत आहे. त्यामुळे रेती घाट लिलाव करावा अशी मागणी गोर गरीब नागरिक करीत आहे जेणे करून शासनाचा लाखोचा महसूल वाचणार.
सध्या घुग्घुस शहरात नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम जोमाने प्रगती पथावर सुरु आहे. या इमारतीच्या बांधकामा साठी वापरण्यात येत असलेली रेती ही अवैध आहे घुग्घुस परिसरातील रेती घाटांचा लिलाव मागील तीन ते चार वर्षा पासून झाला नाही त्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडाला आहे. घुग्घुस शहरातील नवीन ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या ठिकाणी मोठे रेतीचे साठे आहे. त्यामुळे या रेती साठ्यांची महसूल विभागाने चौकशी करावी व ते जप्त करून दोषी कंत्राटदारावर कडक कारवाई करावी अन्यथा घुग्घुस आम आदमी पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...