आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर/नागपूर, दि. 18 जानेवारी : राज्य लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल नुकताच राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर प्रकाशित करण्यात आला आहे. तो मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये असून त्यासोबतच नागरिकांकडून आयोगाकडे सातत्याने विचारणा करण्यात येणारे प्रश्नही मराठी व इंग्रजी भाषेत पोर्टलवर उपलब्ध आहेत.
आयोगाचा वार्षिक अहवाल हा सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी अशा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे नागपूर विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा प्राप्त करण्याचा अधिकार असून या आयोगाच्या माध्यमातून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येते. ‘आपली सेवा, आमचे कर्तव्य’ असे ब्रिदवाक्य असलेल्या या आयोगाद्वारे प्रशासकीय कार्यपद्धती विषयीच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते. त्यामुळे लोकसेवा देणाऱ्या यंत्रणांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे.
आपले सरकार पोर्टलवरील जलद सेवा, सेवा आपल्या दारात, सहज पोहोच, सोपी शुल्कभरणा, वापरण्यास सोपे आणि वेळेची बचत आदी विंडोंच्या माध्यमातून लोकसेवा हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांना मदत करण्यात येते.
राज्य लोकसेवा हक्क आयोगाचा प्रसिद्ध झालेला 2020-21 या वर्षाचा हा अहवाल सर्व नागरिकांना ‘आपले सरकार’ या पोर्टलवरुन विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे. तो 176 पानांचा असून, आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या पुढाकाराने तो तत्परतेने प्रकाशित झाला आहे. त्यात लोकसेवा हक्क कायदा, त्याच्या अंमलबजावणीची राज्यातील सद्यस्थिती आदींसह विविध अनुषंगिक बाबींबाबत सर्वंकष माहिती समाविष्ट आहे. नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून हा अहवाल सहज उपलब्ध झाला असून इच्छुकांना तो सहजरित्या डाऊनलोड करता येणार आहे.
या अहवालाव्यतिरिक्त लोकसेवा हक्काबाबत नागरिकांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्नही आपले सरकार या पोर्टलवर स्वतंत्ररित्या उपलब्ध आहेत. त्यामाध्यमातून नागरिकांद्वारे वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी मार्गदर्शिका उपलब्ध झाली आहे. नागरिकांनी सुलभ संदर्भासाठी हा वार्षिक अहवाल आणि प्रश्नांबाबतच्या मार्गदर्शिकेचे अवलोकन करावे, असे आवाहनही आयुक्त यावलकर यांनी केले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...