Home / चंद्रपूर - जिल्हा / कोविड नियमांचे उल्लंघन...

चंद्रपूर - जिल्हा

कोविड नियमांचे उल्लंघन ।। ७,१०० रुपयांचा दंड वसूल ।। मनपाच्या तपासणी पथकाची कारवाई.

कोविड नियमांचे उल्लंघन ।।  ७,१०० रुपयांचा दंड वसूल ।।  मनपाच्या तपासणी पथकाची कारवाई.

येवले अमृततुल्य वर दंड.

चंद्रपूर  ता. १७ : कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पथकाने तिन्ही झोनमध्ये सोमवारी मुख्य चौक, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची तपासणी केली. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींसह कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाई करीत ७ हजार १०० रुपयाचा दंड आकारण्यात आला. 

नव्या आदेशानुसार आयुक्त विपीन पालीवाल यांच्या निर्देशान्वये मनपाच्या पथकाने मुख्य चौक, गोलबाजार, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची तपासणी केली. सोमवारी झोन क्र. १ मध्ये ४२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. शिवाय मास्क न घालणाऱ्या १३ व्यक्तींवर कारवाई करून २ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. झोन क्र. २ मध्ये दोन आस्थापनांच्या तपासणीत कोविड नियमांचे उल्लंघन होताना आढळून आले. त्यांच्याकडून १००० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच मास्क न घातलेल्या १० नागरिकांविरोधात कारवाई करून १,१०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर झोन क्र. ३ मध्ये बंगाली कॅम्प चौक ते नेहरूनगरपर्यंत तपासणी करण्यात आली. यात २८ दुकाने आणि ३ मंगल कार्यालये यांचा समावेश आहे. दरम्यान मास्क न घातलेल्या ६ व्यक्तींकडून २२०० रुपये दंड वसूल करण्यात आला.  

'येवले अमृततुल्य' वर दंड : सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकल्या प्रकरणी शहरातील येवले अमृततुल्य या आस्थापनाविरोधात घनकचरा व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई करून १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच यापुढे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये, अशी तंबीही महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने दिली.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...