आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि ): काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व जिल्हा भंडारा येथील साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. नाना पटोले यांनी दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलताना “आता आपली ताकद वाढली असून, आपण पंतप्रधान मोदी यांना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो.” अशा वल्गना करत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
नाना पटोलेंच्या या घृणास्पद वक्तव्याबद्दल व देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात आज मंगळवार 18 जानेवारी रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी घुग्घुस येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची विनंती केली. यावेळी माजी सरपंच संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, विनोद चौधरी, श्रीकांत पांडे, नरेंद्र कांबळे यांसह अनेक मंडळी सोबत उपस्थित होते.
काही दिवसांआधी, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवाशी खेळ करण्याची सडकी मानसिकता काँग्रेसची होती मा. नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल कॉंग्रेसी नेत्यांमध्ये किती असूया भरली आहे. हे अशा निंदनीय घटनांमधून वारंवार सिद्ध होते. भारताचे पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेतृत्व करतात. पंतप्रधान पदावरची व्यक्ती कोणत्याही विशिष्ट राजकिय पक्षापुरती मर्यादित राहत नाही. देशाच्या पंतप्रधानांचा सन्मान करणे. हे प्रत्येकाचं कर्त्तव्य आहे. असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...