Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / सुनीता उरकुडे रामपूर...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

सुनीता उरकुडे रामपूर ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी

सुनीता उरकुडे रामपूर ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी

राजुरा : शहरालगत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जात असलेल्या रामपूर येथे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आघाडीच्या सुनीता मधुकर उरकुडे यांचा एक मताने विजय झाला आहे.

रामपूर ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच हेमलताताई ताकसांडे यांनी अगोदर ठरविल्याप्रमाणे अडीच वर्षे कालावधी पूर्ण झाल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेवर (दि. १४) उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले यावेळी काँग्रेस-शिवसेना यांचेकडून अनिता आडे यांनी आवेदनपत्र सादर केले तर, शेतकरी संघटना-भाजपा-राकांपा कडून सुनीता मधुकर उरकुडे यांनी आवेदनपत्र सादर केले. मतदान करताना एक मतदान नोटा ला व दोन्ही उमेदवारांना ५-५ समान मते मिळाली असता सरपंच वंदनाताई गौरकार यांनी निर्णायक मतदान केल्यामुळे सुनीता उरकुडे या एक मंतांनी विजयी झाल्या.

यावेळी मतदानात सरपंच वंदनाताई गौरकर, माजी उपसरपंच हेमताताई ताकसांडे, सुनीता उरकुडे, सिंधुताई लोहे, शीतल मालेकर, संगीता विधाते, लक्ष्मी चौधरी, अनिता आडे, लताताई डकरे, विलास कोदिरपाल, रमेश झाडे, जगदीश बुटले यांनी सहभाग घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी चुने यांनी काम पाहिले.

शिवसेना-काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, तोडाफोडीच्या राजकारणात आघाडीच्या गटातील एका सदस्याला उपसरपंच पदाचे आमिष दाखवीत आपल्या गटात घेऊन उपसरपंच पदाचे उमेदवार म्हणून उभे केले मात्र मतदान करतांना यांच्यातील एका सदस्याचे मतदान अपात्र ठरल्याने सेना-काँग्रेस यांच्यावर नामुष्की ओढवली पर्यायाने सरपंचांनी निर्णायक मतदान करीत आघाडीच्या सुनीता उरकुडे यांना विजयी केले.

यावेळी रमेश गौरकार, सुरेश झाडे, सिंधुताई लांडे, राहुल बानकर, नामदेवराव गौरकार, रामचंद्र घटे, मारोती जानवे, मधुकर उरकुडे, बाबुराव जंपलवार, प्रवीण हिंगाने, प्रभाकर लडके, शंकर उरकुडे आदींनी परिश्रम घेतले. या निवडीबद्दल माजी आमदार वामनराव चटप, संजय धोटे, सुदर्शन निमकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे सतीश धोटे यांनी अभिनंदन केले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...