आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (विशेष प्रतिनिधी): शहरात विविध ठिकाणी मुख्य रस्त्यावर दारुची दुकाने आहेत. या दारु दुकानांकडे स्वत:च्या पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे शेकडो ग्राहक आपली वाहने रस्त्यावर ठेवतात. त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इथे दारु पिणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करुन दारुचा नशेत झिंगलेले त्यामुळे बरेवाईट बोलत असतात याचा पादचाऱ्यांना व महिला व शाळकरी मुलींना सामना करावा लागत असून नाहक त्रास सहन करावा लात आहे. त्यामुळे ही शहराच्या मुख्य मार्गावर असलेली दारुचे दुकाने तात्काळ हटविण्यात यावी व कायदा सुव्यवस्था राखावा यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा उपाध्यक्ष त्यागी देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, जिल्हा सल्लागार संतोष डांगे, अतुल भडके, विनोद मेश्राम यांच्या उपस्थितीत राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वरील गंभीर बाबींची दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन व वाहतूक शाखेने तात्काळ या दारु दुकानांचा बंदोबस्त करावा अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने दारु दुकाने हटविसाठी शेकडो महिला नागरिकांची पोस्टकार्ड पत्रे राज्य उत्पादन शुल कार्यालयात पाठवून दारु दुकाने हटविण्यासाठी मोठे तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर आनंद वाईन शॉप, तुकूम येथील माडर्न वाईन शॉप, मंगेश बिअर बार, नागपूर रोड वरील मनोहर वाईन शॉप, व रस्त्यांवर देशी दारूच्या दुकानापासून मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्पादन शुल्क विभाग, महापालिका, शहर पोलीस, वाहतूक विभाग, जिल्हा पोलीस प्रशासनाचे नागरिकांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष होत आहे. वरील बाबी प्रशासनाने गांभीर्याने घेऊन या दारु दुकाना विरोधात उपाययोजना पाऊले उचलावीत अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेने केली आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...