Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / चिंतामणी महाविद्यालयात...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

चिंतामणी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी..!

चिंतामणी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता  मासाहेब  जिजाऊ यांची जयंती साजरी..!

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधी):  चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित चिंतामणी महाविद्यालय घुगस, जी. चंद्रपूर येथे दिनांक 12 जानेवारी 2022 रोज गुरुवारला स. 10.00 वा. सांस्कृतिक विभागाच्या वतीने युगपुरुष स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर कुंभारे यांनी स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून मल्यारपण  केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. रवी धारपवार हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्राचार्य डॉ. चंद्रशेखर कुंभारे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांच्या उदात्त आणि महान कार्याना  आपल्या दैनंदिन जीवनात  पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांनी घेऊन आपण त्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक असल्याचे सांगितले. 

तसेच  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रवी धरपावर यांनी  " उठा, जागे व्हा, आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका " असे मंत्र त्यांनी यावेळी प्रतिपादित केले. ह्यावेळी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या कार्याची आठवण उपस्थितांना करून दिली. 

 यावेळी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. महेंद्र कुंभारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन कावडकर यांनी केले. तर आभार संतोष गोहोकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील  प्रा. मंगेश जमदाडे, डॉ. माधव कांदांगिरे, प्रा. गणेश सुर्जुसे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रमास  मोलाचे सहकार्य केले.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...