आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर दि. 12 जानेवारी: जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील व्यक्तींची तपासणी माहे ऑक्टोंबर 2021 पासून सुरु असून 12 मार्च 2022 पर्यंत ही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्ती विविध शासकीय योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ऑक्टोबर महिन्यातच ब्रह्मपुरी येथे संबंधित आरोग्य विभागाला दिले होते. यांच्या संकल्पनेतून दिव्यांग व्यक्तीची आरोग्य तपासणी करून प्रमाणपत्राचे वाटप, त्यांच्या प्रमाणपत्राचे नुतनीकरण तसेच नवीन प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करणे आदी बाबी करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी सांगितले.
सदर तपासणी मोहीम 13 जानेवारी रोजी ब्रह्मपुरी, 14 जानेवारी रोजी सिंदेवाही तर 15 जानेवारी 2022 रोजी सावली या तीन तालुक्यातील रुग्णालयांमध्ये पार पडणार आहे. जिल्ह्यातील दिव्यांग रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून या मोहिमेचा प्रचार व प्रसार वैद्यकीय यंत्रणेकडून करण्यात आला आहे. सकाळी 10 ते 1 या वेळेत रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून दिव्यांगांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी केले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...