Home / चंद्रपूर - जिल्हा / अवकाळी पावसाची मदत...

चंद्रपूर - जिल्हा

अवकाळी पावसाची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून दखल

अवकाळी पावसाची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून दखल

विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश

चंद्रपूर दि. 12 जानेवारी:  जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी गारपीट व अतिवृष्टी झाली. त्यामुळे झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी या हातच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची दखल राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली असून विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

हवामान विभागाने जिल्ह्यात 10 व 11 जानेवारीला वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वर्तविली होती. जिल्ह्यात मंगळवार पासून मेघगर्जनेसह पाऊस आला. बल्लारपूर, वरोरा तालुक्यातील काही ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. राजुरा, गोंडपिपरी, जिवती, कोरपना, पोंभूर्णा, मुल, भद्रावती, वरोरा, नागभीड व ब्रह्मपुरी या तालुक्यात अवकाळी पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये गहू, तूर, ज्वारी, चना तसेच रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी झालेल्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करावे. असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले आहे.

विदर्भात तसेच जिल्ह्यामध्ये झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक हिरावले आहे. तसेच काही भागामध्ये पावसाचे पाणी घरात घुसल्याने घरांचे मोठे प्रमाणात नुकसान सुद्धा झाले आहे.घरांचे नुकसान झाल्याने नागरिकांना राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येणार असून प्रशासनाकडून योग्य ती मदत दिली जाईल. असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...