Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / अवकाळी पावसामुळे शेत...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान ।। पंचनामे करून आर्थिक मदत आणि वीजबिल व कर्ज संपवा.

अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान ।। पंचनामे करून आर्थिक मदत आणि वीजबिल व कर्ज संपवा.

शेतकरी संघटनेची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी

सय्यद शब्बीर जागीरदार (जिवती प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच अवकाळी पाऊस व गारपीट आल्याने गहु, हरभरा, मिरची, कापूस, फळझाडे व भाजीपाला या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पीडित शेतकर्‍यांच्या शेताचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि शेतकर्‍यांवर असलेले कर्ज संपवून वीजपंपाचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषिमंत्री व महसूलमंत्री यांचेकडे शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप, प्रांताध्यक्ष ललित बहाळे, माजी आमदार सरोज काशीकर, शैलाताई देशपांडे, सतीश दाणी, ॲड.शरद कारेकर, अरुण पाटील नवले, सुधीर सातपुते, राजेंद्र ठाकूर, अरुण मुनघाटे, मदन कांबळे, सौ.ज्योत्स्ना मोहितकर, सौ.पौर्णिमा निरंजने, ॲड.श्रीनिवास मुसळे, निळकंठराव कोरांगे, सुधीर सातपुते, प्रा.निलकंठ गौरकार, शालीक नाकाडे, दादा नावलाखे, कवडू येनप्रेडीवार, घिसू पाटील खुणे, डॉ.संजय लोहे, पंढरी बोंडे, दिनकर डोहे यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आला असून अनेक ठिकाणी गारपीट झाले आहे. सतत तीन दिवस पाऊस आल्याने अनेक जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हरभरा, कापायला आलेली किंवा कापून ठेवलेली तूर,रब्बी सोयाबीन,मिरची, कापूस, फळबागा व भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी कापूस पिकाला बोंडअळी आल्याने तसेच अवेळी पाऊस आल्याने बोंडसड झाल्याने, सोयाबीन पिकाचे कमी उत्पन्न आल्याने तसेच तुरीचे उभे पीक वाळून गेल्याने आधीच शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकर्‍यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षापासून दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांचे विजेचे बिलही थकीत आहे. 

शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेता सरकारने या शेतकऱ्यांच्या शेताचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी, वीज पंपाचे थकीत वीज बिल माफ करावे, सर्व शेतकर्‍यांवरील कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...