आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे ( घुग्गुस प्रतिनिधी ): ०८ जानेवारी २०२२ रोजी चंद्रपूर मार्गावरील अंतूर्ला गावा लगतच्या स्नेहा फूड & फीड प्रा.ली. कंपनी मध्ये करंट लागून तीस वर्षीय कामगार हरगुन कुमार सैनी याचा मृत्यू झाला. या मजुराला मानवीय दृष्टिकोनातून मदत करायला पाहिजे होती परंतु या मजुराच्या शवाला शासकीय रुग्णालयात ठेऊन अधिकाऱ्यांनी पळ काढला. या घटनेवरून असे स्पष्ट होते की स्नेहा फूड ही कंपनी सुरक्षा नियमांचे पालन करत नाही त्यामुळे मजुरांच्या जीवाला हानी होते. सदर करंट लागण्या मागच कारण कंपनी द्वारा योग्य त्या सुरक्षा नियमांचे पालन केले नसल्यामुळे कामगार वर्गाचा जीव धोक्यात आहे.
या गोष्टीची दखल घेत आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलिस अधीक्षक चंद्रपूर, सुरक्षा अधिकारी चंद्रपूर, पोलिस स्टेशन घुग्घुस, स्नेहा फूड & फीड प्रा.ली. कं. ला निवेदन देण्यात आले व मृतकाच्या परिवाराला भरपाई म्हणून ५० लाख देण्यात यावे व परिवारातील एका सदस्यास एक नौकरी देण्यात यावी. सोबतच कंपनीने सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे कमीत कमी ०५ कोटी रुपयांचे दंड ठोठावण्यात यावे. जेणेकरून अशा प्रकारच्या घटना येणाऱ्या काळात कंपनीमध्ये होणार नाही. ही मागणी पूर्ण न झाल्यास आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला.
यावेळी घुग्घुस आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, सागर बिऱ्हाडे, दिनेश पिंपलकर, निखिल कामतवार , सारंग पिदुरकर, सोनू शेट्टियार, स्वप्नील आवळे, अभिषेक तालापेल्ली व अन्य उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...