Home / महाराष्ट्र / छ.शिवरायांचा संघर्ष...

महाराष्ट्र

छ.शिवरायांचा संघर्ष सत्ता किंवा धर्मासाठी नव्हता तर मानवतावादासाठी होता - रामचंद्र सालेकर

छ.शिवरायांचा संघर्ष सत्ता किंवा धर्मासाठी नव्हता तर मानवतावादासाठी होता - रामचंद्र सालेकर

 शिंदोला (राजू गोरे)-  शिंदोला माईन्स ता.वणी जि.यवतमाळ येथे शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या हर्षोल्हासात अश्वरथामध्ये छ.शिवराय,माॕ जिजाऊ मावळ्यांची वेशभुषा केलेल्या झाकी शोभायात्रेची अप्रतीम रॕली काढून बॕडपथकाच्या गजरात छ.शिवरायांना शिवजयंती दिनी मानवंदना दिली. ही शोभायात्रा  सबंध पंचेक्रोषित आकर्षणनाचा विषय ठरली होती. शोभायात्रेनंतर संतोष सोनटक्के पोलीस पाटील यांचे अध्यक्षतेखाली शिवव्याख्याते रामचंद्र सालेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विजय झाडे,कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ वरोरा,दत्ताभाऊ बोबडे उपाध्यक्ष निर्भिड पत्रकार संघ महाराष्ट्र,संजय निखाडे प.स.सदस्य,ग्रा.पं.सदस्य कल्पना टोंगे,ज्योती उईके,ज्योती बोधाने,अनिल तेलंग,अनिल गाराघाटे,रुपलाल निखाडे,शितल सोनटक्के,शितल रोहनकर,यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवमहोत्सव समीती हनुमान नगर शिंदोला माईन्स द्वारा  कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रामचंद्र सालेकर  राज्यउपाध्यक्ष शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद यांच्या व्याख्यानाने महिलांच्या प्रचंड प्रतिसादात शिस्तबद्ध कोविड 19 च्या सर्व निर्देशाचे पालन करुन संपन्न झाला. आपल्या दिड तासाच्या घनाघाती व्याख्यानात शिवचरित्राची मांडणी करत व्याख्याते रामचंद्र सालेकर यांनी प्राचीन, शिवकालीन,व आजच्या वर्तमानकालीन सामाजिक राजकीय परिस्थितीचे सोदाहरणासह विश्लेषण केले. यामध्ये मानवतावादी सहिष्णू  धर्मनिरपेक्ष,स्त्री सन्माननाचे महामेरु,विज्ञाननिष्ठ, शेतकऱ्यांचे कैवारी,छ.शिवराय विश्वात वंदनिय का बरं आहेत याचे अनेक दाखले देवून पटवून दिले. शिवरायांच्या खऱ्या इतिहासाशी कशाप्रकारे गद्दारी करण्यात आली याचे नमुने देवून मराठा सेवा संघाने संशोधन करुन खरा इतिहास जगासमोर आणला ते स्पष्ट केले.एवढचं नव्हे तर युवकांच्या हातचे शस्त्र काढून त्यांच्या हाती लेखनी दिली व धार्मिक दंगलीतून देश मुक्त केल्याचे सांगितले. आपल्या प्राचिन महान वैभवशाली मातृसत्ताक बळी कृषी शिव सिंधु संस्कृतीचं शिवधर्माच्या माध्यमातून प्रकटन करुन बहुजन समाजाला आपल्यावर लादलेल्या धार्मिक गुलामीतून भयमुक्त भटमुक्त करण्याच फार मोठ कार्य मराठा सेवा संघ व त्यांच्या संभाजी ब्रिगेड ,जिजाऊ ब्रिगेड ...सारख्या तेहत्तीस कक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. शिव फुले शाहु आंबेडकरांच्या विचाराच सरकारचं भारताला महासत्ता बणवू शकते यावर आमचा ठाम विश्वास असून त्यांच्या विचारांची पेरणी गेल्या तीस वर्षापासून अखंडपणे सूरु असल्याचे सांगितले.आपल्या प्राचीन भारताचं गतवैभव  मिळवून परत वैभवशाली भारतासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड एकमेव आशेचा किरण असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
  शोभायात्रेत छ.शिवरायांच्या भुमिकेत हेमंत पांगुळ,राजमाता जिजाऊंच्या भुमिकेत सुप्रिया मासिरकर, तानाजीच्या भुमिकेत सुरेश कोडापे,मावळ्यांच्या भुमिकेत ओम पोडलजवार,आकाश उईके,सर्तेश बनकर यांच्या वेशभुषेने सर्वांचे लक्ष वेधले होते.
 याप्रसंगी विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले यामध्ये रांगोळी स्पर्धा प्रथम श्रेया गोरे, द्वितीय प्रिया बनकर,तृतीय लक्ष्मी कोंडागुर्ले, तर प्रोत्साहनपर पायल झाडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान  करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचलन रविंद्र पांगुळ सर यांनी तर आभार राजेंद्र गोरे यांनी मानले.
 कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी शिवमहोत्सव उत्सव समीती अध्यक्ष पंकज झाडे,उपाध्यक्ष दिपक पिदुरकर, सचिव निलेश गोरे,सदस्य अमोल झाडे,संतोष मासीरकर,सतिश जोगी,विनोद उईके,गणेश कोडापे,रविंद्र ठाकरे,दिवाकर राहुलवार,सचिन रामटेके,उमेश चौधरी,जितू रायपूरे व समस्त हनुमान नगर सिंदोला माईन्स च्या समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...