खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) वणी : राष्ट्रीय जनगणना २०२१ मध्ये ओबीसीं(व्हिजे एनटी, एसबीसी ) ची जातनिहाय जनगणना न करण्याची घोषणा संसदेत करून स्पष्ट नकाराचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करणाऱ्या केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाचा धिक्कार व निषेध करण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी ओबीसी(व्हिजे एनटी, एसबीसी)च्या विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेली ७२ वसतिगृह गेली कुठे? याचा जाब राज्यसरकारला विचारण्यासाठी ओबीसी (व्हिजे एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी,-झरी-मारेगाव, संघर्ष वाहिनी-महाराष्ट्र, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया,नवी दिल्ली च्या वतीने तहसिल कार्यालय, वणी,झरी,मारेगाव समोर ३० ऑक्टोबर ला एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी "" यवतमाळ जिल्ह्यातील दाबाडी गावात चाय पे चर्चा "" या कार्यक्रमात मी जर प्रधानमंत्री झालो,तर २०२१ च्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार असे जाहीर केले होते तसेच २०१८ मध्ये आत्ताचे देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनीही ओबीसीची जातनिहाय जनगणना करणार असे जाहीर केले होते;परंतु आता मात्र या दोघांनीही ओबीसीना दिलेला शब्द न पाळता उलट आमचे सरकार ओबीसीची स्वतंत्र जनगणना करणार नाही असे संसदेत जाहीर करून सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार नाही असे प्रतिज्ञापत्र सादर करून स्पष्ट केले.अश्या मुजोर व खोटरड्या सरकारच्याच्या निषेधार्थ आणि मागील दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने ओबीसी(व्हिजे एनटी, एसबीसी)च्या विध्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह ची घोषणा केली असता दोन वर्षांचा कालावधी लोटूनही अजूनही महाराष्ट्रात एकही वसतिगृह सुरू केले नाही याचा जाब विचारण्याकरिता राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तहसील कार्यालय, वणी समोर ओबीसी (व्हिजे एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, झरी, मारेगावचे अध्यक्ष प्रदिप बोनगीरवार तसेच निमंत्रक मोहन हरडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी (व्हिजे एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी, झरी, मारेगावचे समनवयक नारायण मांडवकर, प्रवीण खानझोडे, सुरेश मांडवकर, विकास चिडे, गजानन चंदावार, प्रा. डॉ. राम मुडे, प्रा. आनंद बन्सोड, प्रदिप बोरकुटे, दिलीप पडोळे, विवेक ठाकरे, बाबाराव गेडाम, पांडुरंग पंडिले, प्रमोद निकूरे, प्रा.बाळासाहेब राजूरकर, अशोक चौधरी, दिपक वऱ्हाडे, मंगल तेलंग, पौर्णिमा शिरभाते, सविता रासेकर, रेखा कार्लेकर,अरुणा जाधव,नीलिमा काळे,अर्चना बोदाडकर,वंदना आवारी,सविता ठेपाले,साधना मत्ते,सुरेखा ढेंगळे, उज्वला दोडके,माधुरी देरकर,साधना गोहोकार,किरण देरकर,ज्योती सूर,संध्या बोबडे,रवींद्र लिचोडे,एस व्ही डोंगरकर,शैलेश नांदेकर,रामजी महाकुलकर,विकेश पानघाटे,अमोल किनाके,जगन्नाथ तुरारे, मनोज दारुनंडे,वैभव ठाकरे,विलास देठे,रफिक शेख,जगदीश ढोके, कैलास बोबडे,उमाकांत भोजेकर,कैलास पचारे, राकेश बरशेट्टीवार, अशोक अंकतवार, सिद्धीक रंगरेज, प्रा धनंजय आंबटकर,रवींद्र आंबटकर, प्रमोद निंबुळकर,संजय खाडे, राजेश पहापळे, शरद तराळे, दिलीप भोयर, नितीन मोवडे, संजय गातडे,अजिंक्य शेंडे,मधुकर रच्चावर ,गजानन मत्ते,प्रमोद इंगोले,मुकेश कडू,प्रा अनिल टोंगे, गणेश धानोरकर,दिलीप कोटरंगे, भुपेंद्र बोढे,विशाल मंचावर,उमेश खापणे, संजय चिंचोलकर,भवानी मांदाडे,भास्कर वाढई, आनंद घोटेकर,सुभाष वैद्य,रवी ढुमणे,रोहन आदेवर, राजेश क्षिरसागर, संदिप ठाकरे,संदिप डहाके आणि असंख्य समाजबांधव उपस्थित उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...