Home / चंद्रपूर - जिल्हा / घरफोडीचे  गुन्हेगार...

चंद्रपूर - जिल्हा

घरफोडीचे  गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात 

घरफोडीचे  गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात 

यात एका महिला गुन्हेगार च्या समावेश 

चंद्रपूर : मागील काही दिवसापासुन चंद्रपुर जिल्हयात वरोरा शहरात दिवसाढवळ्या व रात्रीच्या सुमारास सुद्धा घरफोडी होणे नित्याची बाब झाली आहे अशा गुन्हयांना आळा घालण्याकरिता चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते.

प्राप्त निर्देशानुसार पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे   यांनी एक विशेष पथक नेमुन त्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक दिवसापासुन सापळा रचला होता. दि. 01 ऑक्टॉबर 21 रोजी दुपारच्या सुमारास गोपनिय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  चंद्रपूर येथील घुटकाळा वॉर्ड परिसरात असलेल्या नेहरू शाळेजवळ राहणारी अप्सरा ईलीयास शेख (23) ही आपल्याजवळ सोन्याचा गोफ घेवुन विक्रीसाठी सराफा लाईन चंद्रपुर येथे संशयास्पद स्थितीत फिरत होती .

मिळालेल्या खबरेवरून तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी याना  पाचारण करून पथकामार्फत सदर महिला आरोपीचा सराफा लाईन येथे शोध घेवुन तीला ताब्यात घेतले. सदर महिलेस विश्वासाने विचारपूस केली असता ती व तिचे  मित्र   रेकॉर्डवरील घरफोडीचा गुन्हेगार  फैजुल्ला खान रा. रहनत नगर चंद्रपुर हे दोघेही वरोरा येथे किरायाची रूम करून पोस्ट वरोरा हद्दीतील अभ्यंकर वार्ड येथे राहत होते. त्यांनी त्या घरातील एका आलमारीत चोरी केलेले  सोन्याचांदीचे दागीने ठेवल्याची कबुली देवुन गुन्हयाबाबत सदर महिलेने हकीकत कथन केली. सदर महिलेसोबत घरफोड़ी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार याचा शोध घेणे सुरू आहे

सदर महिलेच्या ताब्यातील चोरी केलेले सोन्याचे गोफ मंगळसुत्र एकुण वजन 20.240 ग्राम व चादीचे पायपट्टी व जोडवे एकुण वजन 56.700 ग्राम असा एकुन 97 हजार  रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील महिला आरोपीकडुन खालील प्रमाणे गुन्हा उघडकीस आला आहे.  पोलीस स्टेशन वरोरा अप के 747/21 कलम 380 भादवी दि.03/10/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक हे पेटोलींग करित असता दुर्गा मंदीर बंगाली कॅम्प चंद्रपुर येथे रेकॉर्डवरील घरफोडीचा गुन्हेगार गौतम उर्फ कोहली गणेश विश्वास ( 22 ) रा फुकटनगर एकता चौक चंद्रपुर यांचे ताब्यातुन एक चांदीची चाळ व चांदीचा छल्ला एकुन वजन 116.200 ग्राम दोन सोन्याचे बादाम अंगठया वजन 10.00 ग्राम असा एकुण 57 हजार  दोनशे  रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद आरोपीने जानेवारी महिण्यात पागलबाबा  नगर चंद्रपूर परिसरातून रात्रोला कुलुप तोडुन सोन्याचांदीचे दागीने चोरले होते . ताब्यातील आरोपीकडुन खालील प्रमाणे गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस स्टेशन रामनगर अप, 004/21 कलम 454, 457, 380 भादवी सदरबी वगरवी कामगीरी अरविंद साळवे  पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो. नि. बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोय, पोलीस उप निरीक्षणा संदिप कापडे, पोलीस उप निरीक्षक अतुल कावले, पो.हवा. संजय कुलवार, पो.कॉ. नितीन रायपुरे, गोपाल गुलदार कुंदनसिंग भाग, प्रांजल झिपे रविंद्र रेग.पो. शि अपर्णा मानकर यांनी केली.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...