वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी पोलीसांच्या विशेष पथकाची कारवाई
ब्रम्हपुरी (प्रतिनिधी): ब्रम्हपुरी तालुक्यातील पाचगाव येथे साईगणेश नावाचे पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावरुन १७ जूलै रोजी रात्रीच्या सुमारास ४२ हजार ८८८ रु. किंमतीचा २०० ली. पेट्रोल व २०० ली. डिझेल अज्ञात चोरांनी चोरी केला होता. त्या आरोपींना पकडण्यात ब्रम्हपुरी पोलीसांच्या विशेष पथकाला यश मिळाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस स्टेशन हद्दीतील जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्यात आल्यानंतर पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवत पोलिस अभिलेखावरील संशयित आरोपी सोनु मेश्राम याला पोलीसांनी विचारपूस केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला विश्वासात घेऊन त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर त्याने सदर गुन्ह्यात त्याच्या सोबत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या इतर तीन जणांचे नावे सांगितली.
त्यावरून गुन्ह्यातील आरोपी प्रदीप उर्फ सोनू केवळराम मेश्राम वय २४ वर्ष रा. रणमोचन, मयुर रामभाऊ नाकतोडे वय १९ वर्ष, शुभम रामभाऊ नाकतोडे वय २१ वर्ष, अपराजित अरुण माकडे वय २२ वर्ष तिघेही रा. उदापुर यांना अटक करण्यात आली. त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेली दोन मोटरसायकल, चोरीचे इंधन भरण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लास्टिक कँन जप्त करण्यात आल्या. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद शिंदे, पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष बोरकर, पोलिस हेड काँस्टेबल नरेश रामटेके, मुकेश गजबे, प्रमोद सावसाकडे, प्रकाश चिकराम यांनी केली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...