वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
क्रिष्णा वैद्य (चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी) ब्रम्हपुरी :- ब्रह्मपुरी शहरला लागूनच असलेल्या ग्रामपंचायत उदापूर येथिल तलावात होत असलेल्या अवैध अतिक्रमणा बाबत दिवाकर मंडपे(पत्रकार) काही माहिती घ्यायला गेले असता त्यांच्याशी तहसिलदार ब्रम्हपुरी यांनी उर्मटपणे बोलत कॅबिन मधून हाकलून दिल्याचा प्रकार तहसील कार्यालय ब्रम्हपुरी येथे घडला.
सविस्तर माहिती याप्रमाणे की,ब्रह्मपुरी शहरला लगतच असलेल्या ग्रामपंचायत उदापूर हद्दीत येणाऱ्या सर्वे नंबर १३७ मधील १ हेक्टर ८१ आर जागेमध्ये तलाव असून या तलावातील पाण्याचा शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसेच जनावरांना पाणी पिण्यास व जलस्तर कायम ठेवण्यात हा तलाव खूप महत्वाचा आहे. परंतु उदापूर येथील एका व्यक्तीने या तलावामध्ये जे.सी.बी.चे सह्याने बांधकामा साठी खड्डे करून सिमेंट काँक्रिटचे पक्क्या घराचे बांधकाम सुरू केले असल्याने .याबाबत दिनांक ७/१२/२०२१ ला ब्रम्हपुरीचे तहसीलदार उषा चौधरी यांना प्रत्यक्षात भेटून तोंडी व लेखी माहिती दिली तसेच श्रद्धा करकाडे तलाठी यांना सुध्दा महिती दिली.परंतु तहसीलदार ब्रम्हपुरी यांचे कडून कुठलीही कारवाई न झाल्याने, मा. तहसीलदार उषा चौधरी, प्रांत अधिकारी बी.डी.ओ. ठाणेदार ब्रह्मपुरी यांना दिनांक १०डिसेंबर २१ ला याचं संदर्भाने लेखी अर्ज दिले.मात्र सदर अवैध बांधकामावर कुठलीही कारवाई न झाल्याने पुन्हा दिनांक १३डिसेंबर २१ला ४:४५ वाजता अर्जदार दिवाकर मंडपे यांनी काही पत्रकारासह तहसीलदार उषा चौधरी यांचे कॅबिनमध्ये भेट घेत तलावामध्ये होत असलेल्या अवैध बांधकामा बाबत चर्चा केली असता. मा.तहसीलदार यांनी उर्मटपणाने बोलणे सुरू केले व तालुक्यातील एका वरिष्ठ पत्रकारास "तुम्हाला हेच धंदे आहेत काहीतरी कागदावरून रंगवणे व दररोज येणे"
"मी तलाठ्याला सांगितले आहे. मला काय करायचे ते मी करतो 'तुला काय करायचे ते कर' मला माहीतच आहे तुम्ही काय करता अश्या उर्मट भाषेत तहसीलदार यांनी काहीही न ऐकता अर्जदार वरिष्ठ पत्रकार दिवाकर मंडपे व इतर सोबतीतील पत्रकारांना आपल्या कॅबिन मधून बाहेर जायला सांगत अक्षरशः हाकलून लावले.
मा. तहसीलदार ब्रम्हपुरी यांचे कडून झालेल्या असभ्य वर्तवणुकीने, तलावातील अवैध बांधकामास तहसीलदार यांचा आशीर्वाद असल्याचे अभिप्रेत होतं आहे तर तलावातील अवैध बांधकाम बंद न झाल्यास अर्जदार आमरण उपोषण करणार व संबंधितांना कोर्टात खेचणार असे दिवाकर मंडपे यांनी सांगितले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...