Home / महाराष्ट्र / घुग्घुस शहरात राजीव...

महाराष्ट्र

घुग्घुस शहरात राजीव रतन रुग्णालय कोविड-१९ रुग्णाकरिता वरदान 

घुग्घुस शहरात राजीव रतन रुग्णालय कोविड-१९ रुग्णाकरिता वरदान 

ऑक्सिजन करिता वाढीव यंत्रणेची गरज       -ब्रिजभूषण पाझारे 

घुग्घुस : महामारी कोरोना परिस्थितीत घुग्घुस शहरासाठी वरदान ठरलेल्या वेकोली चे राजीव रतन रुग्णालयाची सध्या ओळख झालेली आहे. येथील आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व इतर सेवक दिवसरात्र रुग्णाच्या सेवेत कर्तव्य बजावीत आहे.  घुग्घुस येथे मोठ्या प्रमाणात वेकोलि परिसर आहे. वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात घुग्घुस व वेकोलिच्या लोकवस्तीत दिसून येत आहे.  सध्या राजीव रतन रुग्णालयात येथे २८ ऑक्सिजन बेड तर व २८ साधे बेड्स उपलब्ध आहे. वाढत्या रुग्णसंख्या लक्षात घेत येत्या काही दिवसात १५  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १५   पूर्ण क्षमतेचे  व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन प्लॉट लवकरात लवकर उपलब्ध करण्याची गरज आहे. कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत WHO ने निर्देश दिले आहे.  त्यामुळे भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता वेकोली मार्फत नियोजन करण्याची आवश्यकता आहे. 
           आज माजी समाजकल्याण सभापती तथा जि.प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी राजीव रतन वैदकीय अधीक्षक  डॉ. आनंदे  यांची भेट घेऊन रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या असता याठिकाणी ऑक्सिजन कमी पडत असल्याचे  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.  या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित वेकोली महाप्रबंधक व जिल्हाधिकारी यांना मागणी करण्यात आली.    
 राजीव रतन रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक  डॉ. आनंदे वैद्यकीयपदाचे कर्तव्य बजावीत कोरोना रुग्णाच्या सेवेत रात्रदिवस कार्य करिता आहे. राजीव रतन रुग्नालयातील  डॉ.चौधरी व वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असणारे १०० आरोग्य सेवक व सहाय्यक कर्तव्य बजावीत आहे. तसेच कोविड उपचार केंद्रउभारण्यास नेहमी अग्रस्थानी असणारे माजी अर्थमंत्री, आमदार सुधीरभाऊ मूनगंटीवार, माजी केंद्रीय गृह मंत्री हंसराजभैय्या अहिर व वेकोली वणी क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे साहेब यांचे ब्रिजभूषण पाझारे यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...