सुरज तलमले (ब्रह्मपुरी) : १४ जुन २०२१ जागतिक रक्तदान दिनी गरजु गरीब रुग्णांना रक्त पुरवठा व्हावा या सामाजिक जाणिवेतुन विदर्भ ब्लड सेवा ब्रम्हपुरी यांच्या वतीने ख्रिस्तानंद ब्लड बँक ब्रम्हपुरी यांच्या सयुक्त विधमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्याने १४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजीक भान जोपासले यासाठी आशिष ढोरे, विशाल गुरुनुळे, नरेश मेश्राम, प्रधुन्य मेश्राम, रोशन मेने, प्रशांत खरवडे, पंकज येवले, प्रफुल चहांदे, रवि मेश्राम, कुंदन लांजेवार, सुरज बगमारे, अजय दरवे, तुलशी राखडे, अक्षय पांडव, या रक्तदात्यांनी रक्तदान करुन जागतिक दिवस साजरा केला.