वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
पुरोगामी पत्रकार संघ व नागवंश युथ फोर्सचे आयोजन
जिवती (२ जुलै) : हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या १०८ वी जयंती तसेच पुरोगामी पत्रकार संघ राजुराचे तालुका संपर्क प्रमुख अमोल राऊत यांच्या जन्मदिनाचे संयुक्तरित्या औचित्य साधून कृषी दिनानिमित्त आज रक्तदान व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांस्कृतिक सभागृह, साई नगर लेआऊट, शिवाजी वॉर्ड क्रं.९ राजुरा येथे सदर शिबिर पार पडले.
कोविड-१९ महामारीच्या काळात राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत 'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' या उक्तीप्रमाणे पुरोगामी पत्रकार संघ व नागवंश युथ फोर्स राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नव्याने रक्तदान करणाऱ्या तरुण युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यावेळी २२ रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. राज्य रक्त संक्रमण परिषद चंद्रपूरचे जय पचारे व चमूने मोलाचे सहकार्य केले. यावेळी राजुरा येथील हरहुन्नरी युवक महेंद्र सेपूरवार यांचे काल अपघाती निधन झाले. यावेळी त्यांना उपस्थितांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या शिबिरात रविकिरण बावणे, उत्कर्ष गायकवाड, धनराज उमरे, राहुल अंबादे, सतीश कांबळे, गौरव रामटेके, प्रतीक कावळे, संयोग साळवे, राहुल भागवतकर, तुषार पाझारे, आदर्श तेलंग, अनिकेत साळवे, हर्षल गाले, आकाश नळे, आकाश येगेवार, जय खोब्रागडे, जतीन इंमुलवार, विजय मोरे, अक्रम शेख, रुपेश मेश्राम आदीनी उपस्थित राहून सहकार्याची भूमिका बजावली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...