Home / चंद्रपूर - जिल्हा / नकोडा वासियांचा धूळ...

चंद्रपूर - जिल्हा

नकोडा वासियांचा धूळ प्रदूषणाविरोधात रस्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प.

नकोडा वासियांचा धूळ प्रदूषणाविरोधात रस्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प.

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि ):   सोमवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता दरम्यान संतप्त नकोडा वासियांनी वेकोलीची होणारी कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक नकोडा मुंगोली मार्गावर रस्तारोको आंदोलन करून रोखून धरली तब्बल दोन तास रस्तारोको आंदोलन केल्याने कोळशाच्या जडवाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या दुपारी 1:30 वाजता रस्तारोको आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

नकोडा गावाच्या जवळील रस्त्यावरून वेकोली वणी क्षेत्राच्या मुंगोली व पैंनगंगा या कोळसा खाणीतून कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक दिवस रात्र सुरु असते त्यामुळे धुळीच्या प्रदूषणात मोठयाप्रमाणात वाढ झाली याचा नकोडा वासियांना मोठा त्रास सहन करावा लागत  आहे धुळीच्या प्रदूषणा मुळे नकोडा वासियांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. वेकोलीतर्फे रस्त्यावर टँकरने पाणी मारण्यात येत नाही आहे व रस्ते ही खड्डे पडून खराब झाले आहे त्यामुळे अपघात स्थळ बनले आहे. वेकोलीला वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नकोडा वासियांनी रस्तारोको आंदोलन केले.

रस्तारोको आंदोलन सुरु होताच घुग्घुस वेकोलीचे उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे व पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांनी आंदोलन स्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली व चर्चा केली यावेळी वेकोलीने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देताचा रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले तसेच नकोडा वासियांनी नकोडा मुंगोली रस्त्यावर दिवसातून तिन वेळा टँकरने पाणी मारणे, नकोडा येथे वीज ट्रान्सफार्मर लावणे, स्थानिकांना रोजगार देणे, राम मंदिर रस्त्यावर पथ दिवे लावणे, रस्ता सिमेंट कॉक्रिटचा बनविणे, साफसफाई करणे, ब्रेकर लावणे अश्या विविध मागण्याचे निवेदन वेकोलीचे ओमप्रकाश फुलारे यांना दिले.

 यावेळी नकोडा जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, सदस्य तनुश्री बांदूरकर, रजत तुराणकर, राजय्या कंपा, प्रभाकर लिंगमपेल्ली, सुजाता गिद्दे, चंदर ताला, भाजपा अध्यक्ष बाळकृष्ण झाडे, आनंद मेंढे, जुनेद सय्यद, कल्पना मेंढे, सरोजा पोल, राजम्मा पोल, इंद्रकुमारी बतुल्ला, पुष्पा तोटा, लावण्या पोल, जया चंडाला, मरियम्मा कंडे, रुची सोप्पर, शारदा मोलगू, सरोजा दासारपू, सुमा तोटा, संजना कोलानी, अमृतराव कंडे, शंकर ननगूरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...