Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती पंचायत समिती...

चंद्रपूर - जिल्हा

जिवती पंचायत समिती कार्यालयात ग्रामसेवक संघटनेला काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करण्याची परवानगी दिली कोण..?

जिवती पंचायत समिती कार्यालयात ग्रामसेवक संघटनेला काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करण्याची परवानगी दिली कोण..?

सय्यद शब्बीर जागीरदार ता.प्रतिनीधी ( जिवती ) :- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा तालुका जिवती यांच्या वतीने पंचायत समिती जिवती येथे संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली वरोरा तालुक्यातील अटमुरडी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक गोपिचंद खानेकर या ग्रामसेवकाला ग्रामपंचायत मध्ये गावातील व्यक्ती कडून मारहाण करण्यात आली होती तेव्हा संबंधित आरोपिवर गुन्हा दाखल होऊन सुध्दा अद्यापर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नाही या निषेधार्थ पंचायत समिती कार्यालय काळ्या फिती लावून हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक कक्षा मध्ये धरणे आंदोलन करण्यात परवानगी दिली कोण? असा प्रश्न रुग्णसेवक जिवन राजाराम तोगरे यांनी उपस्थित केला आहे. सध्या कोरोनाचा संकटातून आपली सुटका झाली नाही आहे आणि धरणे, आंदोलन, मोर्चे, घोषणा बाजी,सभा, जास्तीत जास्त गर्दी करने इतर काही कार्यक्रमावर नियम लावण्यात आले आहेत. सोशल डिसंटन पाळणे माॅस वापरने बंधनकारक असुन सुद्धा या नियमाला बगल देण्यात आले असुन सुद्धा सामान्य माणसाला वेगळा कायदा कर्मचाऱ्यांसाठी वेगळा कायदा आहे का ? कोरोना काळी काही निर्बंध लावण्यात आले त्या निर्बंध न पाळता पायदळी तुडवण्याचे काम ग्रामसेवक संघटनेच्या वतीने करण्यात आले यांच्यावर कारवाई होणार का? आंदोलना संदर्भात मा. सभापती यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत सभापती यांना काहीही माहीत नाही, जेव्हा बातमी पेपर मध्ये आली तेव्हाच माहीत झालं.असे प्रकार घडले नाही पाहिजे म्हणून संवर्ग विकास अधिकारी यांना यापूर्वीही सूचना दिलेल्या होत ." व या बाबत प्रशासकीय अधिकारी म्हणून संवर्ग विकास अधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे तसेच कार्यवाही करण्याचे तात्काळ आदेश काढण्याची सूचना सुध्दा देण्यात आली आहे "अशी प्रतिक्रिया पंचायत समिती सभापती सौ अंजनाताई पवार यांनी व्यक्त केले आहेत"

"सदर प्रतिनिधीने मोबाईल फोन वर संपर्क करुन संवर्ग विकास अधिकारी पेंदोर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी असे काही घडले नाही वसंतराव नाईक कक्षात धरणा आंदोलन व निषेध, घोषणा बाजी काही करण्यात आलेले नाही बातमी रंगवन्याचे काम काही लोक विणाकारण करून बदनामी करण्याचे काम करीत आहेत अशी प्रतिक्रिया संवर्ग विकास अधिकारी पेंदोर साहेब पंचायत समिती जिवती यांनी सदर प्रतिनिधींशी व्यक्त केली"

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...