आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे आक्रोश आंदोलन
चंद्रपूर: याआधी जेव्हा भाजपा-शिवसेना सरकार होते तेव्हा ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. त्यामुळे ओबीसी समाजाबद्दल भाजपाला नेहमीच आस्था राहिली आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाकरिता असलेले राजकीय आरक्षण रद्द केले. ही अतिशय दुःखद बाब आहे. महाविकास आघाडी सरकारने कोर्टामध्ये ओबीसी समाजाची बाजू योग्य पध्दतीने न मांडल्यामुळे हे आरक्षण रद्द झाले. या आधी मराठा आरक्षण व आता ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संवेदनहीन असल्याचे दिसुन आले आहे. या गोष्टीचा भाजपा निषेध करीत आहे. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार असे प्रतिपादन, भारतीय जनता पार्टी चंद्रपूरतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवार (३ जून) रोजी आयोजित आंदोलनात बोलताना विधीमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमीत्त श्रध्दांजली वाहिली.
यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (श) डॉ. मंगेश गुलवाडे, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, ओबीसी मोर्चा जिल्हा संयोजक अविनाश पाल, महानगर ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी, उपमहापौर राहूल पावडे, भाजपा महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, संजय गजपूरे, क्रिष्णा सहारे, जि.प. सभापती नागराज गेडाम, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, न्यायालयाने वारंवार निर्देश देवून आणि भाजपाच्या पाठपुराव्यानंतरही महाविकास आघाडी सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात चालढकल सुरूच आहे. हा आयोग स्थापन करून सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत मागीतली असती तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द करण्याची वेळच आली नसती. राज्य सरकारच्या या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. भाजपा सर्व समाजाला घेवून पुढे जाणारा पक्ष आहे. परंतु ज्या गोष्टी याआधी हक्काने त्या त्या समाजाला मिळाल्या त्या तशाच ठेवून व कायद्याच्या चौकटीत बसवून आता ओबीसींना न्याय देण्यात यावा. महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले असून भाजपा ओबीसी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा कटिबध्द असून या समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्यात येईल, असा गर्भीत ईशारा त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे संचालन भाजपा ग्रामीण ओबीसी आघाडी अध्यक्ष अविनाश पाल यांनी केले तर महानगर ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी यांनी आभार मानले. या आंदोलनात अॅड. सारिका सुंदरकर, वंदना संतोषवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्राचार्य प्रज्ञा बोरगमवार, राजेंद्र तिवारी, पुनम तिवारी, राजेंद्र खांडेकर, अरूण तिखे, शुभांगी दिकोंडवार, दिक्षा सुर्यवंशी, विलास खटी, प्रशांत चौधरी, संदीप आवारी, मधुकर राऊत, प्रभा गुडधे, रामजी हरणे, सुरेश कलोजवार, श्रीनिवास जनगम, सुरज पेदुलवार, विजय वानखेडे, सतिश धोटे, पारस पिंपळकर, आशिष देवतळे, नरेंद्र जिवतोडे, सुनिल नामोजवार, सुरेश केंद्रे, केशव गिरमाजी, दत्ता राठोड, अमोल देवकाते, विनोद देशमुख, रणजीत पिंपळशेंडे, राजू ठाकरे, प्रविण ठेंगणे, संदीप उईके, विनोद चौधरी, हेमंत उरकुडे, प्रविण सातपुते, किशोर गोवारदीपे, यांची उपस्थिती होती.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...