Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / गोवरी येथे भाजपाचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

गोवरी येथे भाजपाचे रास्ता रोको आंदोलन

गोवरी येथे भाजपाचे रास्ता रोको आंदोलन

उपविभागीय अभियंता यांचे पाच दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन; शेकडो ट्रकांच्या लांबच लांब रांगा

राजुरा : राजुरा-गोवरी-कवठाळा मुख्य मार्गाचे बांधकाम मागील अनेक दिवसांपासून रखडले असून याचा त्रास सर्व सामान्य नागरिक व वाहनधारकांना होत आहे, रस्त्यावरुन उडणाऱ्या धुळीच्या लोंढ्यानी नागरिकांचे जगणे कठीण झाले असून हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. तात्काळ रखडलेल्या रस्त्याचे काम सुरु करण्याच्या मागणीसह इतर मागण्या घेऊन गोवरी, पोवनी, चिंचोली (बु.) येथील भाजपच्या वतीने गोवरी येथे जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

बल्लारपूर वेकोळीअंतर्गत असलेल्या कोळसा खाणीतील कोळशाची वाहतूक करणारा राजुरा-गोवरी-कवठाळा मार्गाच्या रस्त्याचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे ते तात्काळ सुरु करण्यात यावे, वेकोलीची कोळसा वाहतूक व नाला दुसरीकडून वळविल्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, चिंचोली (खु), साखरी गावांना जोडणारा जिल्हा मार्ग वेकोलीने तोडल्या गेला तो पुरवत करण्यात यावा यासह इतर मागण्या घेऊन गोइरी येथे (दि. १०) सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात आले.  आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलन स्थळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली असता बांधकाम उपविभागीय अभियंता बाजारे यांनी पाच दिवसात रस्त्याचे बांधकाम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे, नगरसेवक राजू डोहे, हरिदास झाडे, विलास खारकर, सचिन डोहे, संदीप पारखी, अविनाश उरकुडे, भास्कर इटनकर, शंकर बोढे, चेतन बोभाटे, सिद्धार्थ कासवटे, हरीचंद्र जुनघरी, भास्कर जुनघरी, महेश कोडगीरवार, गोसाई उताने, महादेव लोहे, विठ्ठल उताने, कुसं पडवेकर, प्रभाकर इटनकर, महेश गंधेमवार, पांडुरंग चिंचोलकर, विलास लोहे, गज्जू साळवे, गज्जू उरकुडे, अरुण मशारकर, शंकर गोंडे यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

राजुरातील बातम्या

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा*

*अवैध दारू बंदीसाठी पेलोराची नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर : कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा* ✍️दिनेश...

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध*

*युवक काँग्रेसच्या वतीने राज्य सरकार व कंगना रानौतचा निषेध* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-- हिंदवी...

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* *भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा*

*आदिवासी समाज व महानायकांचा संघर्ष जगाला प्रेरणादायी : आमदार सुभाष धोटे* भेंडवी येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य...