Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / आघाडी सरकार बरखास्त...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

आघाडी सरकार बरखास्त करा, १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ वणीत भाजपाचे आंदोलन..

आघाडी सरकार बरखास्त करा, १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ वणीत भाजपाचे आंदोलन..
ads images
ads images

(वणी विभागीय प्रतिनिधी) : विधानसभेत ओबिसी आरक्षणाच्या संदर्भात आवाज बुलंद करणाऱ्या भाजपाच्या बारा आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आज दि. ६ जुलै ला येथिल तहसील कार्यालयासमोर वणी तालुका व शहर भाजपाचे वतिने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करित सरकार बरखास्त करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांच्या मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

Advertisement

ओबिसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या भाजपाच्या बारा आमदारांना निलंबित करुन महाराष्ट्र शासनाने लोकशाही ला बदनाम करण्याच काम चाललं आहे. महाराष्ट्रात सरकारचे हे वर्तन दडपशाहीचे असून केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन व त्यातही विरोधकांना बोलु न देणे हे हुकुमशाहीचे धोरण असुन अधिवेशनाच्या नावाने चाललेला हा तमाशा तमाम महाराष्ट्राचा अपमान आहे.सरकारच्या या लोकशाही व ओबिसी विरोधी धोरणाचा निषेध करुन महाआघाडी सरकार त्वरित बरखास्त करावे अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. तसेच बारा आमदारांचे निलंबन मागे न घेतल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Advertisement

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय पिदुरकर, जिल्ह्याचे महामंत्री रवि बेलुरकर,वणी पं.स.चे सभापती व वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे यांनी महाआघाडी सरकारच्या विरोधात जोरदार हल्ला चढवला होता. यावेळी किशोर बावणे जिल्हा सचिव, श्रीकांत पोटदुखे न.प.उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष वणी, जि.प.सदस्य बंडुभाऊ चांदेकर, संघदिप भगत, राकेश बुग्गेवार नगर सेवक, सचिन खाडे जिल्हा सचिव ओबिसी मोर्चा, नितीन वासेकर युवा मोर्चा जिल्हा महामंत्री, संजय झाडे, सत्यजित ठाकुरवार,आशिष डंभारे, शुभम गोरे, महेश देठे, मनोज सरमुकद्दम, अविनाश आवारी, दिपक पाऊनकर यांचेसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या