Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / ओबीसी आरक्षणासाठी वणीत...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

ओबीसी आरक्षणासाठी वणीत भाजपाचे आंदोलन

ओबीसी आरक्षणासाठी वणीत भाजपाचे आंदोलन

ओबीसी आरक्षणासाठी वणीत भाजपाचे आंदोलन

वणी: ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणार्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आंदोलन करत आहे. याचाच एक भाग म्हणुन आज दि.१५ सप्टेंबर ला वणी शहर व तालुका भाजपाच्या वतिने स्थानिक आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली येथिल तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यानंतर उपविभागिय अधिकारी डॉ.शरद जावळे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगीतले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यात काही हालचाली केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जी चा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय ५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे तालुका पातळीपर्यंत आंदोलन करत आहे. तरी येणाऱ्या आगामी नगरपरिषद महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका या महा विकास आघाडी सरकाने ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी काही उपाय योजना लवकरात लवकर करावी अशी मागणी वणी शहर व तालुका भाजपाच्या वतिने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, पं.स. सभापती तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे, विजय पिदुरकर माजी जि.प.सदस्य, किशोर बावणे जिल्हा सचिव, गजानन विधाते तालुका अध्यक्ष, श्रीकांत पोटदुखे शहराध्यक्ष, निलेश होले सभापती जलपुर्ती, सचिन खाडे जिल्हा सचिव ओबिसी मोर्चा, मंगल बल्की, राकेश बुग्गेवार सरचिटनिस, संतोष डंभारे,कैलास पिपराडे,रवी रेभे,सुनिल भटगरे, निलेश डवरे, मंजु डंभारे, सौ.स्मिता नांदेकर महिला अध्यक्षा,रजनी हिकरे, संध्या लोडे, आरती वांढरे सभापती बांधकाम न.प. वणी ईत्यादींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...