Home / यवतमाळ-जिल्हा / ATM मधून पैसे उडविणाऱ्या...

यवतमाळ-जिल्हा

ATM मधून पैसे उडविणाऱ्या बिहारच्या टोळीला अटक; बिहारमध्ये जाऊन यवतमाळ पोलिसांची कारवाई

ATM मधून पैसे उडविणाऱ्या बिहारच्या टोळीला अटक; बिहारमध्ये जाऊन यवतमाळ पोलिसांची कारवाई
ads images
ads images

२ ऑक्टोबर २०२१ रोजी राळेगावमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून आठ लाख ६९ हजार रुपये चोरीला गेल्याच्या तक्रारीनंतर सुरु केला तपास

भारतीय-वार्ता/यवतमाळ प्रतिनिधि: पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने घेतला शोध एटीएम कार्ड क्लोन करून नागरिकांचे पैसे उडविणार्‍या आंतरराज्यीय टोळीला अखेर अटक करण्यात आली आहे. सायबर सेलच्या पथकाने बिहार राज्यात जाऊन ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एटीएम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बिहारमधील गया जिल्ह्यामधील सुकेशकुमार अनिल सिंग, सुधीलकुमार निर्मल पांडे या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आलीय.

सायबर पथकाने तांत्रिक कौशल्याच्या आधारावर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करीत थेट बिहार गाठले. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करुन यवतमाळला आणण्यात आलंय. दोघांच्या ताब्यातून इंटरनल एटीएम स्कॅनर, हॅन्ड एटीएम स्कॅनर, बनावट एटीएम तयार करण्यासाठी लागणारे स्किमर, १५ एटीएम व रोख रक्कम असा एकूण एक लाख २८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २ ऑक्टोबर २०२१ रोजी राळेगावमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम सीसीटीव्ही कॅमेरावर काळा स्प्रे मारुन गॅस कटरने एटीएम कापून आठ लाख ६९ हजार रुपये रोख चोरुन नेले. यानुसार तक्रार दाखल करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. १०० किलोमीटर परिसरामधील दुकाने, बाजारपेठांमधील सीसीटीव्ही तपासण्यात आल्याची माहिती यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मारुती कंपनीची अर्टीगा गाडी संक्षयास्पदरित्या यवतमाळमध्ये अनेक ठिकाणी फिरताना दिसून आली. त्याचबरोबर कळंबमधून ऑक्सिजन सिलेंडर चोरीला गेल्याची तक्रारही दाखल झाल्याने याच गाडीच्या माध्यमातून चोरी झाल्याचा संक्षय बळावला आणि त्या दिशेने चौकशी करत प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आल्याचं पाटील भुजबळ यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा.

वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...