Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / भेंडवी घाट - पाटण ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

भेंडवी घाट - पाटण ते शेणगाव  या मुख्य रस्त्याचे काम त्वरित सुरू करा तालुक्यातील जनतेची मागणी

भेंडवी घाट - पाटण ते शेणगाव  या मुख्य रस्त्याचे काम त्वरित सुरू करा तालुक्यातील जनतेची मागणी

भेंडवी घाट - पाटण ते शेणगाव  या मुख्य रस्त्याचे काम त्वरित सुरू करा तालुक्यातील जनतेची मागणी

जिवती: चंद्रपूर जिल्ह्याच्या मानीकगड पहाडावरील शेवटच्या टोकावर वसलेल्या अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखला जाणार्‍या जिवती तालुक्यातील मुख्य मार्ग म्हणजे शेणगाव, पाटण ते गडचांदूर रस्ता आहे अनेक ठिकाणी केवळ गिट्टी पसरलेली आहे. त्यामुळे कोणतेही वाहने चालविणे म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याने साधे पायी चालनेही शक्य नाही.

रस्त्यात  जागोजागी खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते या रस्त्यावर दररोज वाहन चालकांचे अपघात होत आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

रात्रीच्या वेळी या रस्त्यावर वाहने चालविने धोक्याचे झाले आहे . परंतु त्यांना माहीत नसते की, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे ,गिट्टी जमा झाली आहे.तेव्हा त्यांचा अनेक वेळा अपघात झालेला आहे. समोरून मोठी वाहन आल्यानंतर सर्वत्र धूळ पसरते त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने दुचाकी वाहन चालकांना गिट्टीतून वाहन घालवावी लागते. रुग्ण व गर्भावती स्त्रियांना दवाखान्यात घेऊन जाण्यास खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वेळावेळी या रस्त्यासाठी संबंधित विभागाला सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या वतीने वर्तमानपत्राच्या माध्यमातून व निवेदनाद्वारे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप या मागणीची संबधित विभागाचे अधिकारी व या क्षेत्रातील जनप्रतिनिधीने गांभीर्याने दखल घेतली नाही. रस्त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात घडले आहे.

संबंधित विभाग आणि जनप्रतिनिधी लोकांनची अपघात होऊन मृत्यूची वाट बघत आहे की काय अशी या क्षेत्रातील जनता बोलत आहे आता आमच्या सहनशिलतेची मर्यादा संपली आहे. यामुळे  आमच्या रोषाला संबंधितांना सामोरे जावे लागेल. शेणगाव, पाटण ते गडचांदुर रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...