वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
९ फेब्रुवारी भारतीय कामगार संघटनेचे जनक "नारायण मेघाजी लोखंडे" यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन
भारतीय वार्ता: महात्मा फुलेंयांच्या विचारांवर “रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे” यांनी १८९० साली भारतामध्ये “बॉम्बे हॅण्ड्स मिल असोसिएशन” नावाची पहिली संघटना स्थापन केली. ते शिरूर पुणे येथील होते तसेच ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्तेही होते.
भारत जेंव्हा ब्रिटिश भारत होता तेंव्हा असंघटित कष्टकरी गिरणी कामगारांना कामाचे तास नव्हते, आठवडयाची साप्ताहिक सुट्टी नव्हती.गिरणीत काम करताना गंभीर दुखापत झाली तर दवाखाण्याचा खर्च मिळत नव्हता. कामावर नाही तर पगार नाही. काम करून महिना झाला तरी कोणत्या तारखेला पगार मिळेल याची हमी नाही. या सर्व समस्यांवर असंघटित कष्टकरी गिरीणी कामगाराचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांना संघटीत करून गिरणी मालक संघा विरोधी संघर्ष सुरू केला. कामगारांच्या संघर्षला मालक दाद देत नव्हते. तेव्हा त्यांनी ५५०० गिरणी कामगारांच्या सहया घेऊन फँकटरी कमीशनचे अध्यक्ष डब्ल्यु.बी. मुलक यांच्याकडे १५ ऑक्टोबर १८८४ रोजी पिटीशन दाखल केले, त्याचे फळ सहा सात वर्षाच्या संघर्षानंतर १० जून १८९० ला मिळाले त्यावेळी गिरणी मालक संघाने जाहीर सभा घेऊन त्यात नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुचविलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून मागण्या मान्य केल्या, त्यातिल सर्वात महत्वाची मागणी "रविवारची साप्ताहिक सुट्टी" होय.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार मंत्री असताना कामगार कायदयात तशी कायमची तरतुद केल्या मुळेच भारतातील तमाम सरकारी कर्मचारी व अधिकारी रविवारच्या सुट्टीचे मुक्त-भोगी आहेत.
आजच्या अनेक सुशिक्षित व उच्च शिक्षित नोकरी करणार्यां कर्मचारी आणि अधिकार्यांना याची माहिती नसेल? त्यांनाच काय त्यांच्या कामगार संघटना, युनियन चालविणाऱ्या नेत्यांना सुध्दा रविवारची सुटटीचे जनक हे असंघटित कष्टकरी गिरणी कामगारांना संघटीत करणारे सत्यशोधक चळवळीचे (OBC) कुशल संघटक नारायण मेघाजी लोखंडे होते आणि रविवारच्या सुट्टी चे कायद्यात रुपांतर करनारे (SC) घटनेचे एकमेव शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर होते हे आज किती कर्मचारी आणि अधिकार्यांना माहिती आहे?
आज देशातील संघटित आणि असंघटित कर्मचारी अधिकार्यांच्या संघटनांना भांडवलदार जुमानत नाही नेतृत्वाची दखल घेत नाहीत, कारण कामगारांच्या संघटनचे नेतृत्व शोषित-पडिता कडे नसून शोशकांच्या अर्थात उच्चवर्णिच्या हातात आहे.कामगार ज्याच्या कडे न्यायाची अपेक्षा करातो तो शाशक भांडवलशाहीचा समर्थक आहे आणि जो कामगारांना न्याय मिळवून देन्या साठी संघटना निर्माण करतो तो सामाजिक सररचनेत शोशक व ब्राह्मणशाही समर्थक आहे.
भांडवलशाही व ब्राह्मणशाही शोषित पिडित बहुजनांना न्याय मिळवून देतील का?
आजच्या वर्तमानातला कर्मचारी व अधिकारी आंदोलनाचा हाच खरा प्रश्न आहे?
"नारायण मेघाजी लोखंडे" या थोर कामगार नेत्याच्या महान कार्यास कोटी कोटी प्रणाम !!!
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...