Home / महाराष्ट्र / भद्रावती पोलिसांनी...

महाराष्ट्र

भद्रावती पोलिसांनी केले ४१ लाखाचे गावठी दारुचे साहित्य नष्ट, नाकाबंदीत १० लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त 

भद्रावती पोलिसांनी केले ४१ लाखाचे गावठी दारुचे साहित्य नष्ट, नाकाबंदीत १० लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त 

भद्रावती पोलिसांनी केले ४१ लाखाचे गावठी दारुचे साहित्य नष्ट, नाकाबंदीत १० लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त 

भद्रावती,दि.३(विनोद ठाकरे):  भद्रावती शहरात कडक लाॅकडाऊन चालू असल्याने देशी-विदेशी दारु सहज मिळणे कठीण झाल्याने गावठी दारुचा महापूर आल्याचे भद्रावती पोलिसांना माहित होताच त्यांनी नजिकच्या बरांज तांडा परिसरात धाड टाकून ४१ लाख ९० हजाराचे गावठी दारुचे साहित्य नष्ट केले. 
      प्राप्त माहितीनुसार, राज्यात लाॅकडाऊन सुरु होताच भद्रावती शहरात अवैध मार्गाने मिळणा-या  देशी-विदेशी दारुचे भाव गगनाला भिडले. त्यामुळे अनेक तळीरामांनी आपला मोर्चा नजिकच्या बरांज तांडा वस्तीत मिळणा-या गावठी दारुकडे वळविला. त्यामुळे बरांज तांडा परिसरात जंगलाच्या आस-याने गावठी दारु गाळणारांचे मोठे पिक आले. ही बाब पोलिसांना माहित होताच जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील सिंग पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार, पो.शि. केशव चिटगिरे, निकेश ढेंगे, हेमराज प्रधान आणि शशांक बदामवार यांनी दि.२६ ते २८ एप्रिलपर्यंत बरांज तांडा परिसरात विशेष मोहिम राबविली. या मोहिमेत गुळ दारु, गुळ सडवा आणि गुळ दारु गाळण्याचे साहित्य असा एकूण ४१ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. 
        दरम्यान दुस-या एका घटनेत दि.३ मे रोजी पोलिसांना अगदी सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर-नागपूर महामार्गावर एन.टी.पी.सी.जवळ केलेल्या नाकाबंदीदरम्यान देशी दारुसह १० लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
      एम.एच.३१, ई.क्यू.०५३४ क्रमांकाची शिवरलेट कार नागपूर वरुन अवैधरित्या देशी दारु घेऊन चंद्रपूरच्या दिशेने निघाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार सकाळी ६ वाजता एन.टी.पी.सी.जवळ नाकाबंदी करण्यात आली.दरम्यान,सदर शिवरलेट कारच्या चालकाने पोलिसांना पाहुन भरधाव वेगाने आपली कार दमटली. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता कार दूरवर थांबवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कारची झडती घेतली असता कारमध्ये २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ९० मि.लि. मापाच्या संत्रा देशी दारु राॅकेटच्या २ हजार५०० निपा २५ खर्ड्याच्या बाॅक्समध्ये आढळून आल्या. ही सर्व दारु, १ हजार रुपयाचा भ्रमणध्वनी संच आणि ८ लाख रुपये किंमतीची शिवरलेट कार असा एकुण १० लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कारचालक श्रीकांत रमेश समर्थ (२४) रा. जुना बाबुळखेडा, नागपूर याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...