खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (विशेष-प्रतिनिधी): विनाकारण वाद घालून एका वाहन चालकाला एका जनाने आपल्या मित्रासह लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना २७ नोव्हेंबरला रात्री ९ वाजताच्या सुमारास शास्त्रीनगर येथे घडली. याबाबत वाहन चालकाने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपीसह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे.
शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या रसीद खान पीर खान पठाण (२९) हा स्वमालकीचे वाहन चालवितो. २७ शनिवारी तो पांढरकवडा येथे मालवाहतूक करून रात्री ९ वाजता वणीला पोहचला. शास्त्री नगर येथील ऐका वाचनालयाजवळ अमित चांदेकर (२९) रा. नारायण निवास मागे हा दुचाकीने रसीद खान याच्या वाहनाजवळ आला. समोर वाहने असल्याने रसीद खान थांबला असतांना आरोपीने विनाकारण त्याच्या गाडीचा साईडग्लास फिरवला. रसीद खान याने साईडग्लास का फिरविला असे विचारताच अमित चांदेकर याने रसीद खानला शिवीगाळ करित मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्या सोबत असलेल्या दोन मित्रांनी रसीद खानला वाहनाच्या खाली ओढत मारहाण केली. अचानक झालेल्या मारहाणीत तो ओरडू लागला ओरडणं ऐकून आसपासचे लोकं मदतीला धावून आल्याने अमित व त्याच्या मित्रांनी पळ काढला. रसीद खान याच्या नाका तोंडाला जबर मार लागल्याने नाकातोंडातून रक्त वाहू लागले. त्यानंतर रसीद खान याने वणी पोलिस स्टेशनला गाठुन अमित चांदेकर व दोन मिञा विरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमित चांदेकर व दोन मित्रांविरुद्ध भादंवि कलम ३२५, ३४ अनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात सूरू आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...